महाराष्ट्र वेदभुमी

खांब विभागीय प्रिमियर लीग मानकरी; दोस्ती यारी फायटर, तर उपविजेता अर्पण इंटरप्रायसेज संघ .

कोलाड (श्याम लोखंडे ) रोहा तालुक्यातील खांब विभागातील खांब विभागीय असो.आयोजित प्रीमियर लीग पर्व नववे क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात अखेर अतितटीच्या लढतीत दोस्ती यारी फायटर संघ ठरला स्पर्धेत अंतिम विजेता.तर स्पर्धेतील अंतिम सामना दोस्ती यारी फायटर नडवली- चिल्हे विरुद्ध अर्पण इंटरप्रेसेज बाहे यांच्यात झालेल्या अखेरच्या अंतिम अटीतटीच्या सामन्यात अखेर दोस्ती यारी फायटर संघाने धडाकेबाज खेळी करत अंतिम बाजी मारत या पर्वातील लीगच्या चषकावर आपले नाव कोरले तर अर्पण इंटरप्रेसेज संघाला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.तसेच लीग मधील स्पर्धेतील तृतीय क्रमांक स्मरण वॉरीयर्स बाहे..

हा संघ मानकरी ठरत चतुर्थक्रमांक शिवकृपा इंटरप्राइजेस मुठवली या संघाने पटकावले तर चषकातील मालिकावीर-नितिन भोसले,उत्कृष्ट फलंदाज-नितेश कोंडे,उत्कृष्ट गोलंदाज-ज्ञानेश्वर महाडिक,तसेच अखेरचा अंतिम फेरीतील सामन्याचा उत्कृष्ट फलंदाज नितीन भोसले,तर गोलंदाज ज्ञानेश्वर महाडिक हे ठरले तर दोन दिवसातील खेळाच्या सामन्यात उत्कृष्ठ खेळाडू म्हणुन नितीन भोसले आणि ज्ञानेश्वर महाडिक हे ठरले तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणून स्वराज वाळंज यांना प्रमुख पाहुण्याच्या शुभहस्ते यावेळी गौरविण्यात आले..

खांब विभागीय क्रिकेट असोसिएशन च्या मान्यतेने तसेच सालाहाबाद प्रमाणे यंदा ही या विभागीय असो. च्या वतीने ८ व ९ मार्च रोजी गावदेवी येथील महीसदरा नदी किनाऱ्यावरील भव्य प्रांगणात या खेळाचे दोन दिवस आयोजन करण्यात आले होते.तर दोन दिवसीय आयोजित या प्रीमियर लीग चषकाच्या सोर्ध्येला येथील खेळाडूंनी तसेच रसिक प्रेषकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. आयोजित केलेल्या स्पर्धा भव्य दिव्य असे क्रिकेट सामन्याचे उद्घाटन खांब विभागातील युवकांचे स्पुर्तीस्थान तसेच गोवे ग्राम पंचायतीचे कर्तव्यदक्ष सरपंच महेंद्रशेठ पोटफोडे, तसेच युवकांचे प्रेरणास्थान खांब ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मनोज भाई शिर्के,कुणबी समाजोन्नती संघ मुंबई ग्रामीण शाखा रोहाचे उपाध्यक्ष अनंत थिटे,खांब धामणसई विभागीय ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे अध्यक्ष तथा पत्रकार डॉ. श्यामभाऊ लोखंडे, युवा सामाजिक कार्यकर्ते राकेश कापसे, सुजित कचरे,विभागीय क्रिकेट असो.अध्यक्ष अजय भोसले,उपाध्यक्ष नितेश कोंडे, मनोज थिटे,संदेश मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभहस्ते करण्यात आले आदी सर्व खेळाडू तसेच क्रिडा रसिक बहुसंख्येने उपस्थित होते...

खांब क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने तसेच असो. चा समजला जाणारा मानाचा पर्वातील प्रीमियर लीगच्या स्पर्धा भव्यदिव्य आयोजित केलेल्या सदरच्या मर्यादित शतकाच्या क्रिकेट स्पर्धेला रसिकप्रेशकांचा भरभरून प्रतिसाद लाभला होता...

तर असो. विभागीय स्पर्धेतील २०२५ पर्व ९ वे या प्रीमियर लीगमध्ये एकूण सहा संघ आपापले संघ मालक टीम घेऊन सहभागी झाले होते. मनोज शिर्के आणि श्याम लोखंडे यांची दोस्ती यारी फायटर, अनंत थिटे यांची अर्पण इंटरप्रायसेज टीम, सुरज कचरे यांची आराध्य इलेक्ट्रिकल्स, राकेश कापसे यांची शिवकृपा इंटरप्रायसेज टीम, रोशन मोरे यांची स्मरण वॉरीयर्स टीम, अलंकार खांडेकर यांची वेद पावर हीटर्स टीम,असे सहा संघ मालक आणि त्यांच्या टीमचे खेळाचे प्रदर्शन उपस्थित रसिकप्रेशकांना आनंद देऊन गेले.तर खेळातील रंगतदार सामन्यातील दोस्ती यारी फायटर विरुद्ध अर्पण इंटरप्रायसेज, अंतिम फेरीतील सामन्याचा रंगतदार थरार यांच्यात झाला तर प्रथम नाणेफेक जिंकून दोस्ती यारी फायटर संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारून अर्पण इंटरप्रायसेज संघाला प्रथम फलंदाजी करता निमंत्रण केले.अटीतटीची लढत संघाची तसेच फलंदाजांची चौकार षटकारांची आतषबाजी धुव्वांधार खेळी त्यातच गोलंदाजाची खरी कसरत अखेरच्या क्षणी कामी आल्याचे दिसून आले या अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामान्याय अर्पण इंटरप्रायसेज संघावर मात करत दोस्ती यारी फायटर संघाने आपल्या संघ मालकांना खुश करत प्रीमियर लीग चषकावर नाव कोरत अंतिम सामना जिंकला.तर अर्पण इंटरप्रायसेज संघाला अखेर दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागेले...

तर सदरच्या आयोजित करण्यात आलेल्या खांब विभागीय प्रीमियर लीगच्या सर्ध्येसाठी कै रामदास विश्वनाथ झुंजारराव यांच्या स्मरनार्थ राहुल झुंजारराव यांनी चषक पुरस्कृत केले, तर सामन्यातील मालिका वीर सायकल - शुभम पोटफोड़े यांच्या कडून पुरस्कृत करण्यात आली होती, स्पर्धेतील उत्कृष्ट सामनावीर चषक रविंद्र रामचंद्र मरवडे (सरपंच तळवली) उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज यांस प्रमोद शिंदे आणि राजेश सुटे यांच्या कडून कूलर पुरस्कृत करण्यात आले होते... तसेच या अभूतपूर्व ठरलेल्या या स्पर्धेतील फलंदाज आणि गोलंदाज यांना स्मार्ट वॉच राहुल झुंजारराव यांच्याकडून तर क्षेत्ररक्षण-समीर लाड़गे यांच्या वतीने कुलर पुरस्कृत करण्यात आले होते...

अभुतपुर्व प्रतिसाद लाभलेल्या खेळाचे उत्कृष्ट समालोचन निलेश जाधव,आणि  प्रथमेश लोखंडे यांनी केले...तर सदरची स्पर्धा यशस्वी पार पडण्यासाठी खांब विभागीय क्रिकेट असोिएशनच्या  सर्व पदाधिकारी वर्गाने व खांब क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष अजय भोसले नितेश कोंडे सह सर्व खेळाडूंनी अथक परिश्रम घेतले...

Post a Comment

Previous Post Next Post