महाराष्ट्र वेदभुमी

करुणा शिंदे महिला दिनी सन्मानित.

 


माणगाव :- (नरेश पाटील) 1997 साली पासून होमगार्डमध्ये सेवा बजावत असलेल्या करुणा शिंदे यांची येतोचित सन्मान नुकताच संपन्न झालेल्या जागतिक महिला दिन कार्यक्रम वेळेत करण्यात आला... सदर सन्मान नामांकित संस्था सर्व विकास दिपतर्फे करण्यात आला... करुणा शिंदे यांचा सन्मान सर्व विकास दिप संस्थेचे अध्यक्ष थॉमस भाऊ यांच्या हस्ते उपस्थित सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीत करण्यात आला... सन्मान पूर्वी करुणा शिंदे यांचे अल्प परिचय तसेच तिचा 28 वर्ष सेवेबद्दल माहिती देऊन त्यांच्या योगदानाची दखल घेऊन हा गौरव करण्यात आल्याचा विशेष उल्लेख करण्यात आला...  

 दरम्यान करुणा शिंदेनी सन्मानित झाल्याबद्दल प्रतिक्रिया देताना सांगितले की माझा आयुष्यात प्रथमच माझा सन्मान झालाय... मी अतिशय भारावून गेले.... व्यासपीठावर उपस्थित राहण्याचाही तितकाच मला आनंद मिळाला... काही वर्षापूर्वी एका स्पर्धेत जिंकल्याने मला बक्षीस कार्यक्रमदरम्यान देण्यात आला, या व्यतरिक्त मी कधीही सन्मानित झाले नाही... मात्र माझा सन्मान होमगार्ड सेवेत मी गेली अनेक वर्ष सेवा देत आले आहे..आणि याची दखल घेऊन सर्व विकास दीप संस्थेनी  महिला दिनी माझा सन्मान केला.. याबद्दल मी संस्थेची मनापासुन आभार व्यक्त करते असे मत मांडले...

 करुणा शिंदे यांचे पुष्प गुच्छ तसेच प्रतीक मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.. दरम्यान करुणा शिंदे यांचे महिला दिनी सन्मान झाल्याबाबत अनेकांनी कौतुक व शुभेच्छा दिल्या...

Post a Comment

Previous Post Next Post