महाराष्ट्र वेदभुमी

चोरबाहुली-चोरखुमारी रोडवर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

देवलापार हद्दीत भीषण अपघात-ट्रकचालक फरार! प्रशासन बघ्याची भूमिका!

सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक:- नागपूर जिल्ह्यातील चोरबाहूली - चोरखुमारी बायपास रोडवर आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडला... भरधाव वेगात आलेल्या अज्ञात ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली, आणि त्यात मोठी आई-पुतण्याचा जागीच मृत्यू झाला... या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली असून, कलाबाई लांजेवार (वय ४०) आणि आदित्य वासनिक (वय २१), दोघेही अंबाझरी (पथरई) येथील रहिवासी अशी करण्यात आली आहे... आज दुपारी दोघेही एमएच ४० एई ०६५७ क्रमांकाच्या दुचाकीवरून रामटेकच्या खासगी रुग्णालयात जात होते... मात्र अचानक मागून आलेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला उडवले...

धडक एवढी भीषण होती की, दुचाकी चक्काचूर झाली आणि दोघेही ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागेवरच चिरडले गेले... रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहाचे दृश्य पाहून नागरिकांच्या अंगाचा थरकाप उडाला...

अपघात होताच ट्रकचालक घटनास्थळी थांबण्याऐवजी ट्रकसह पसार झाला. नागरिकांनी तातडीने देवलापार पोलिसांना आणि ओरिएंटल टोल प्लाझा खुमारी टीमला याची माहिती दिली. काही वेळातच टोल प्लाझा टीम आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले... 

या भीषण अपघातामुळे मृतकांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे... गावकऱ्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे... मृतदेह ताब्यात घेऊन उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय, देवलापार येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, फरार ट्रक आणि चालकाचा शोध सुरू केला आहे... मात्र, अद्याप कोणताही ठोस मागोवा लागलेला नाही...

हलगर्जीपणाचे ठळक उदाहरण

हा अपघात केवळ दुर्दैवी नाही, तर वाहतूक व्यवस्थेतील गंभीर हलगर्जीपणाचे ठळक उदाहरण आहे... आता प्रश्न हा आहे की, ट्रकचालकाला अटक होणार का? मृत्यूला जबाबदार असलेल्या या वाहतूक व्यवस्थेवर कारवाई होणार का?

Post a Comment

Previous Post Next Post