महाराष्ट्र वेदभुमी

द्रोणाचार्य शिक्षण प्रसारक संस्था ठाण्याच्या वतीने श्री. संदेश गायकवाड यांना Best Social Activity Managing Person पुरस्काराने


ठाणे न्युज ब्युरो: द्रोणाचार्य शिक्षण संस्था ही दिवा शहरातील एक नामांकित संस्था आहे... ह्या संस्थेच्या माध्यमातून  १६०० विद्यार्थी शिक्षण घेत असून ही संस्था सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असते... उपेक्षित समाज व शिक्षणापासून वंचित असलेल्या तळागाळातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य ह्या संस्थेद्वारे केले जाते. तसेच ह्या संस्थेचे संस्थापक आदरणीय श्री. विनोद पाटील सर हे कायमच सामाजिक क्षेत्रात उच्च स्थानावर असतात..

नुकताच ह्या संस्थेचा वर्ष 10 वा वर्धापन दिवस डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला होता... ह्या सोहळ्यात ३००० हजारहून अधिक विद्यार्थी, पालक वर्ग उपस्थिती होते. तसेच ह्या सोहळ्यात अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. यामध्ये प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, संस्थाचालक, शिक्षणतज्ज्ञ, उद्योजक व अनेक राजकीय नेत्यांचा समावेश होता.

संदेश गायकवाड हे तालुका रोहा, रायगड येथील देवकान्हे गावातील रहिवासी असून ते गेली ०६ वर्ष अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून विशेष समाजकार्य करत असून मुंबई येथील एका नामांकित आंतरराष्ट्रीय  कोकण कला व शिक्षण विकास संस्थेमध्ये ते कार्यरत आहेत ही संस्था गेले १३ वर्ष १० राज्यात मदतीचे कार्य मोठ्या जोमाने करत आहे... संस्थेच्या माध्यमातून त्यांनी हजारो नागरिकांना मदत केली असून रायगड, ठाणे, पालघर व मुंबई ह्या जिल्ह्यांत ते प्रामुख्याने सामाजिक कार्य करत आहेत...

प्रतिष्ठित संस्थाध्यक्ष, उच्च अधिकारी, नामांकित वकील, कंपनी संचालक व नामवंत समाजसेवक ह्यांच्यासोबत त्यांचे चांगलेच संबंध असून त्यांनी अशा अनेक थोर समाजसेवकांच्या माध्यातून हजारो नागरिकांना व विद्यार्थ्यांना मदतीचे हात पुढे केले आहेत...

लहान वयातच सामाजिक क्षेत्रात गायकवाड त्यांनी स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे... अनेक सामाजिक उपक्रमांत त्यांना गौरविण्यात आले असून आपण ह्या समाजाचे काहीतरी देणेकरी आहोत हीच प्रामाणिक भावना कायम मनात ठेऊन ते हे सामाजिक कार्य करत आहेत..

द्रोणाचार्य संस्थेच्या सहसंचालीका आदरणीय सौ.प्रियंका पाटील मॅडम यांच्या हस्ते हजारो नागरिकांच्या उपस्थितीत हा सामाजिक पुरस्कार श्री.संदेश गायकवाड यांना प्रदान करण्यात आला..
या भव्य सोहळा अत्यंत उत्साही व आनंदात पार पडला.. संस्थाचालक, विद्यार्थी, पालकवर्ग व मंचावर उपस्थितीत अनेक मान्यवरांचे गायकवाड यांनी विशेष आभार मानले...

Post a Comment

Previous Post Next Post