महाराष्ट्र वेदभुमी

टेक्नोडीअन '२५, महोत्सवाचे थाटात उद्घाटन

 


सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक: - कविकुलगुरु इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलाजी अँण्ड सायंस (किट्स) रामटेक मध्ये विद्यार्थ्याच्या वतीने राष्ट्रिय स्तरावरील तांत्रिक व सांस्कृतीक युवा महोत्सव, टेकनोडियन २५ चे ३ दिवसीय आयोजन ६ ते ८ मार्च २०२५ दरम्यान करण्यात आले...

६ मार्चला सकाळी महोत्सवाचे उद्घाटन एनसीसी नागपूरचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अंकुर भटनागर यानी केले. तर कार्यक्रमाची अध्यक्षता वोडीथला शिक्षण संस्थाचे सचिव व्ही. श्रीनिवासराव यानी केली. यावेळी प्रामुख्याने प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे, विद्यार्थी डीन. डॉ. पंकज आष्टणकर, संयोजक डॉ. संजयकुमार बोरिकर, विद्यार्थी प्रतिनिधी जुबेर सय्यद व विवेक एलकापेल्ली  सहित  मोठ्या संख्येत, प्राधापक व विद्यार्थीि उपस्थित होते... कर्नल अंकुर भटनागर म्हणाले की कठीण परिश्रमामुळे शिखर गाठता येते... त्यांनी कारगील युद्धाच्या रोमांच सांगीतला व म्हणाले की भारतीय सैनिकांनी शिस्त व सांघीक प्रयत्न करून कारगील फत्ते केले... त्यांनी युद्धाच्या वेळेसचा आपला साहसी प्रवास सांगीतला... ते म्हणाले की विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व कठीण परिश्रम केल्यास यश नक्की मिळते... त्यानी अभियांत्रीकी विद्यार्थ्यांना सैन्यामध्ये येण्याचे आव्हान केले... वोडीथला शिक्षण संस्थाचे सचिव व्ही. श्रीनिवासराव म्हणाले की अभ्यासाव्यतीरीक्त सांस्कृतीक व तांत्रिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भाग घेतल्यास कलागुणांना वाव मिळतो... टेक्नोडीअन २५ मधे युवा संसद, राष्ट्रीय परिषद, पोष्टर सादरीकरण, खजाना शोधने, कला महोत्सव, नौका स्पर्धा, इ-स्पोर्ट, धनुर्विद्या, हॅकथान, ओपन माईक, जुक बॉक्स आदि स्पर्धा आहेत... ८ मार्चला दुपारी २.३० वाजता टेक महिंद्रा नागपूरचे उपाध्यक्ष आदित्य भाटिया यांचे हस्ते समापन होईल व सायंकाळी रंगारंग संगीत कार्यक्रम रागा अँण्ड रॉक्स सादर केल्या जाईल... कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किट्सचे सचिव श्री वी. श्रीनिवास राव, श्री प्रणव व प्राचार्य यांच्या मार्गदर्शनात अधिष्ठाता, संयोजक,प्राध्यापक व विद्यार्थी सातत्याने प्रयत्नशील आहेत... उद्घाटन कार्यक्रमाची प्रस्तावना संयोजक डॉ. संजयकुमार बोरिक, संचालन नेहा चीखले व रुद्रांश चंदनखेडे तर धन्यवाद जुबेर सय्यद यानी केले...

Post a Comment

Previous Post Next Post