महाराष्ट्र वेदभुमी

ग्राम पंचायत प्रशासनाचा गैरप्रकार उघडकीस

 

बंजारटोला येथे ग्रामस्थांना सांडपाणी मिश्रीत पाण्याचा पुरवठा

आदिवासीबहुल भागातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात

प्रतिनिधी :सचिन चौरसिया

रामटेक:- आधुनिक युगात जिथे शासन एकीकडे गावखेड्यांच्या उत्थानासाठी पुढे सरसावत मोठ मोठा निधी ग्रामपंचायतींच्या सरळ खात्यात देऊन गावांसह ग्रामस्थांचा विकास साधण्याचा प्रयत्न करीत आहेत तिथेच दुसरीकडे काही ग्रामपंचायत प्रशाषण आपल्या ढिसाळ व दुर्लक्षीत नियोजनामुळे गावांच्या विकासाला ग्रहण लावत चक्क ग्रामस्थांच्या आरोग्याशीस खेळतांना दिसत आहे. असाच प्रकार सध्या रामटेक पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्राम पंचायत पथरई च्या बंजारटोला गावात उघडकीस आलेला आहे...


आदिवासीबहुल भागातील ग्रामपंचायत पथरई अंतर्गत पाच गावे येतात. त्यामध्ये पथरई, हिवरा, अंबाझरी, शहापुर तथा बंजारटोला या गावांचा समावेश असुन हे गाव ग्रामपंचायत प्रशाषणासाठी दुर्लक्षित गाव असल्याचे दिसुन येत आहे. गावांमध्ये विद्युत बल्ब मार्फत प्रकाश करणे, पाणि पुरवठा करणे, स्वच्छता राखणे तथा इतर अनेक जबाबदाऱ्या ग्रामपंचायत प्रशाषणावर असतात. त्यासाठी ग्रा.पं. प्रशाषण ग्रामस्थांकडुन विविध कर वसुली करून त्यांना या सुविधा पुरवित असते... भरीस भर आता तर पंधरा वित्त आयोगामध्येही पाणि तथा इतर काही मुलभुत सुविधांवर निधीची शासनाने तरतुद केलेली आहे असे असले तरीही मात्र एखाद्या गावातील ग्रामस्थांना सांडपाणी मिश्रीत पाण्याचा पुरवठा होत असेल याहुन मोठी शोकांतिका कोणती? असेच म्हणावे लागेल... बंजारटोला येथे ग्रा.पं. प्रशासनामार्फत नाली बांधण्यात आलेली आहे. मात्र गाववस्ती संपण्यापुर्वीच हे नाली बांधकाम संपलेले आहे. पुढे या नालीचे पाणि जाण्यासाठी काहीही मार्ग नसुन एक खड्डा तेथे पडलेला आहे... या खड्डयात नालीद्वारे वाहुन येणारे लोकांच्या बाथरूम मधील सांडपाणी साचत असते आणि याच खड्डयात ग्रामपंचायतद्वारे गावाला पाणिपुरवठा करणाऱ्या पाईप लाईनचा पाईप बुडुन आहे... विशेष म्हणजे या पाईपलाईनला येथेच एन्ड कॅप लावलेला असुन ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार हा पाईप येथे ठिकठिकाणी लिक झालेला आहे... तेव्हा खड्ड्यातील सांडपाणी या पाणिपुरवठ्याच्या पाईप मधील पाण्यात मिश्रीत होवुन हे पाणि ग्रामस्थांच्या घरी नळाद्वारे जात असते... हा घृणास्पद प्रकार लक्षात येताच ग्रामस्थांनी या पाण्याचा वापर करणे बंद केले असुन नाईलाजास्तव हॅन्डपंपचे पाणि ते वापरत आहे... या प्रकारामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला असुन भरीस भर म्हणुन पुढे मार्ग नसल्याने सांडपाणी येथे साचुन त्यात डासांची उत्पत्ती तथा दुर्गंधीयुक्त वातावरण तयार झालेले आहे... येथे एकप्रकारे ग्रामस्थांच्या आरोग्याशीस खेळ चाललेला आहे... शासनाने ग्रामपंचायतमध्ये ज्ञानी माणुस म्हणून लाखाच्या घरात मासीक वेतनावर नियुक्त केलेला ग्रामपंचायत अधिकारी या गावात सहसा भटकत नाही... ग्रा.पं. प्रशासनाची कार्यप्रणाली बरोबर नाही असेही यावेळी बंजारटोलावासीयांनी प्रतिनिधी जवळ बोलून दाखविली...

 मी आजच तेथे जावुन पहातो - लव्हाळे

याबाबद ग्रामपंचायत पथरई चे ग्रामपंचायत अधिकारी लव्हाळे यांना या समस्येबाबद विचारणा केले असता ते या समस्येपासुनच अनभिज्ञ असल्याचे दिसुन आले... त्यांना विचारणा केली असता ' मी आजच तिथे जावुन पहातो ' असे उत्तर त्यांनी यावेळी दिले...

Post a Comment

Previous Post Next Post