महाराष्ट्र वेदभुमी

शंकरराव हरिभाऊ म्हसकर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वतीने विविध कार्यक्रम संपन्न.


पुगाव - खांब (नंदकुमार कळमकर): रोहा तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, संस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या शंकरराव हरिभाऊ म्हसकर सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजयंती निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याविषय पुगाव येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तर सदरच्या सर्ध्येत वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रश्न मंजुषा अशा विषयांवर सहभागी स्पर्धकांकडून ही स्पर्धा घेण्यात आली तर छोटा गट अंगणवाडी ते दुसरी,तिसरी ते सहावी,सातवी ते दहावी,खुला गट यात ही स्पर्धा घेण्यात आली बहुजनांचा राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या यांच्या जीवन चरित्र या विषयांवर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती याला विद्यार्थी वर्गाचा तसेच स्पर्धकांच उत्सपूर्त प्रतिसाद लाभला...

पुगाव येथे स्व. हरिभाऊ लक्ष्मण म्हसकर ग्रंथालय सभागृहात संस्थेचे संस्थापक तथा मार्गदर्शक शंकरराव म्हसकर यांच्या विशेष सहकार्यातून संपन्न झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी कुणबी समाजाचे रायगड जिल्हा सरचिटणीस शिवराम महाबले,यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी रोहा तालुका कुणबी समाज तसेच संस्थेचे उपाध्यक्ष मारुती खांडेकर , ज्येष्ठ नेते नारायणराव धनवी,पुगाव ग्राम पंचायतीच्या सरपंच नेहा म्हसकर, सौ सुप्रिया क्षीरसागर,संस्थेचे अध्यक्ष गणेश म्हसकर, बबन म्हसकर, हरिश्चंद्र धामणसे, डॉ.श्यामभाऊ लोखंडे,सह आदी संस्थेचे पदाधिकारी व स्पर्धक बहुसंख्येने उपस्थित होते...

सदरच्या निबंध स्पर्धेत पहिला गट-

आर्या नंदकुमार कळमकर,तनुष्का सुरेश अधिकारी,

अद्‌वैत रुपेश अधिकारी,दुसरा गट - नुपुर राजेश म्हसकर, श्रावणी संतोष शिंदे,ईश्वरी सुरेश अधिकारी,

खुला गट-श्रेया प्रशांत म्हसकर,पूर्वा ज्ञानेश्वर देशमुख

खेता भुषण देशमुख,यांनी पारितोषिक पटकावले,तर

वक्तृत्व स्पर्धेतून लहान गट स्वस्ती संदिप खामकर,

श्रेय महेश म्हसकर,ओवी विकास शिंदे,दुसरा गट

आराध्य अजित देशमुख,मुग्धा चंद्रकांत अधिकारी,

शुभ्रा सुरेश देशमुख,तिसरा गट श्रवण शरद मासक,

तनिष्का सुरेश अधिकारी, वेद ज्ञानेश्वर देशमुख,खुला गट -पुर्वा ज्ञानेश्वर देशमुख, 

तसेच प्रश्नमंजुषा पहिला गट नुपुर राजेश म्हसकर,सिद्धी तुकाराम धामणसे, ईश्वरी सुरेश अधिकारी,दुसरा गट श्रेया प्रशांत म्हसकर,सि‌द्धी तुकाराम धामणसे,पूर्वी ज्ञानेश्वर देशमुख,अश्विनी तेजस म्हसकर,सह विजेत्या विद्यार्थ्यांचे उपस्थित मान्यवरांकडून कौतुक करत त्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तसेच सहभागी स्पर्धकांना देखील संस्थेचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले...

श्रुती म्हसकर,कोमल म्हसकर, चेतना म्हसकर, यांनी स्पर्धा पार पाडली तर स्पर्धेसाठी सौ पल्लवी करवंजे, प्रियांका लोखंडे,सौ सुप्रिया क्षीरसागर यांनी सर्व स्पर्धकांचे परीक्षण केले.तर सदरची स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले...

Post a Comment

Previous Post Next Post