महाराष्ट्र वेदभुमी

निसर्गपूरक नैसर्गिक रंग निर्मिती कार्यशाळा

 

नैसर्गिक रंग तयार करण्याचे शिकवले तंत्र-साक्षोधन कडबे 

सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक :- राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय नवेगाव खैरी अंतर्गत राष्ट्रीय हरित सेना व निसर्ग मित्र मंडळ, वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय पारशिवनी (सा. वनी.) आकाशझेप फाऊंडेशन रामटेक यांचे संयुक्त विद्यमाने १३ मार्चला ‘रंग माझा वेगळा’ या उपक्रमांतर्गत रोपवाटिका सामाजिक वनीकरण, नवेगाव खैरी येथे निसर्गपूरक रंग निर्मिती कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी हरित सेनेचे समन्वयक शिक्षक साक्षोधन कडबे यांनी हळद, पालक, सांबार, पुदिना, कडुलिंबाची पाने, देशी मेहंदी, गाजर, बीट, जास्वंद, गुलाब आणि पळसाची फुले यापासून पावडर, पेस्ट आणि पाण्यातील नैसर्गिक रंग तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून घरच्या घरी रंग निर्मितीचे तंत्र मुलांना शिकविले... वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर कैलुके यांनी पर्यावरणपूरक होळी या विषयावर मार्गदर्शन केले... 

कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र चन्ने, प्रा. अरविंद दुनेदार, शिक्षक दिलीप पवार, रितेश मैंद, सौ. अर्चना येरखेडे, वनपाल अनिल राठोड, वनरक्षक सूरज चोपडा, दिनेश ठाकरे, वनमजूर बाळकृष्ण ढोके, गजानन ढोंगे हे प्रामुख्याने उपस्थित होते... कार्यशाळेसाठी अंजली कळमकर, सेजल कळमकर, प्रतीक्षा तुपट, नंदिनी पुरकाम, आरुषी राऊत, प्रतीक्षा वारकर, अक्षरा कळमकर, प्रमोद भलावी, गोविंद चक्रवर्ती, यश डायरे, कल्याणी मेंढेकर, वंशिका ठाकरे, भुवनेश्वरी शेंडे, समीक्षा सोनटक्के, हर्षु पिल्लारे, किंजल चव्हाण, अक्षरा राऊत, रीत तांदूळकर, वंशिका सावरकर, सक्षम सोनेकर, विकेश कोरचे, हर्षल कुंभरे, दीक्षा ढोंगे या निसर्गदुतांनी विविध फुलांचे संकलन केले. या कार्यशाळेत इको क्लब सदस्य असलेल्या इयत्ता पाचवी ते दहावीच्या निसर्गदुतांनी सहभाग नोंदविला...

Post a Comment

Previous Post Next Post