महाराष्ट्र वेदभुमी

खांदाड वस्ती जवळील तलाव येथील मगरीबाबत फॉरेस्ट खात्याची भेट.

रेशक्यू टीमचे पथक ही दाखल.

माणगाव :- (नरेश पाटील) खांदाड येथील वस्तीजवळ एका तलाव  ठिकाणी मगरिंचे वास्तव्य एन उन्हाळ्यात आढळून आले आहे... याबाबत स्थानिकाकडून दुजोरा आहे... तर रविवारी. 02 मार्च 2025 रोजी रात्री 08:55 च्या वेळेत तलावाच्या भागात श्री. वालेराव यांच्या निवास जवळील ठिकाणी मोरी असलेल्या भागात तीन छोट्या मगरी तलाव काठावर एका तरुण युवकाला दिसल्या..याबाबत तात्काळ फॉरेस्ट खात्यालाही कळविले....तसेच बातमी अंक स्वरूपात कळविण्यात आली... बातमीची दखल घेत वनरक्षक खाते मंगळवारी दी. 04 रोजी दुपारी सदर मगरिंचा वास्तव्य असलेल्या तलाव भागत भेट देऊन निरीक्षण करुन वरिष्ठ यांनी  मागरिंची बंदोबस्त होण्यासाठी एक अर्ज फॉरेस्ट खात्याला अति तात्काळ देण्यात यावी म्हणून भेटी दिलेल्या अधिकारी यांनी वार्तालाप करताना सांगितले...जेणेकरून रेशक्यू टीमला पाचरण करुन सर्व मगरिंना या तलावातुन काढून आदिवासी भागात सोडले जाईल असे अंतीपुष्ठी जोडली आहे...  काही महिना पूर्वी पावसाळी काळात या भागात मागरिंची उचांक पहायला मिळाला आणि फॉरेस्ट खात्यानी या तालाव भागाच्या उत्तर भागात हिरवा जाळी कापड सुमारे 50 मिटर बांधले होते.. मात्र मगरिनी उन्हाळात आपला मोर्चा पश्चिम भागाकडे वळवून काठावर तसेच रस्तेच्या कडेला काळोख तसेच मानवी वस्ती वर्दळ ठिकाणी मुक्त संचार करू लागली आहे... तर आता वन विभाग ऍकशन मोडमध्ये येत या दोन चार दिवसात तलावातून मगर काढण्याची मोहीम हाती घेणार आहे.. दरम्यान खांदाड येथील अनेक तरुण युवक यांनी काही महिन्यापूर्वी सुमारे दोन अडीच फूट लांबिचा एक मगर बाळा पोवार यांच्या निवासाजवळ पकडून काल नदीत सोडल्याचे घटना घडली होती... 

 मंगळवारी  माणगाव फॉरेस्ट खातेची वनपाल श्री. डी. एस. सुभेदार तसेच वनरक्षक माणगावचे वैशाली जा.भोर तसेच स्थानिक रहिवाशी श्री. वालेराव भीमसेन, श्री. सुनील धुमाळ सह उपस्थित होते... कोलाड येथीलचे रेशक्यू टीम सायंकाळी आपला ताफ्यासह तलाव भागत भेट देऊन मगर कसे पकडला जाईल याची सविस्तर निरीक्षण करुन मगर काढण्याचा निश्चित नियोजन करून निर्गमन झाले. टीमचे प्रमुख सागर दहिंबेकर तसेच माणगावचे प्राणी तथा पक्षी मित्र शंतनू कुवेस्कर होते... तसेच तलाव जागेचे मालक पोलीस पाटील नथुराम पोवार ही उपस्थित होते..

Post a Comment

Previous Post Next Post