रोहा प्रतिनिधी(नंदेश गायकर) .. रोहा तालुक्यातील शेड सई ग्रामपंचायत हद्दीत अमित सहदेव म्हात्रे यांनी प्रशासनाला न जुमानता सरास गावठी दारू विक्री चालू ठेवली आहे... वरील व्यक्तीविरोधात त्यांच्या गावचे ग्रामस्थ हेमंत भोई व महिला भगिनी यांनी स्थानिक पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली होती... परंतु सदरहू व्यक्ती अजूनही स्थानिक प्रशासनाला न जुमानता आपला अनधिकृत व्यवसाय करत आहे.. अशी माहिती आम्हाला मिळाली... जर अश्या मस्त वाल माणसावर कड्क कारवाई करण्याची प्रशासनाने दखल घेतली नाही तर स्थानिक ग्रामस्थ आणि महिला भगिनी कायदा हातात घेऊन पुढील होणाऱ्या रोषाला स्थानिक पोलीस प्रशासन जबाबदार असेल. वरील व्यक्ती लक्ष्मीखार गावचा रहिवासी असून गावच्या रस्त्यालगत असलेल्या शासनाच्या जागेवर जनतेला दाखवण्यासाठी एक छोटस अनधिकृत हॉटेल थाटले आहे. परंतू त्याच जागेत मुख्य व्यवसाय तो दारू विक्री करत आहे. दारूच्या व्यसनाच्या आहारी जाऊन अनेक संसार उघड्यावर आली आहेत. आजूबाजूचे तरुण युवक दारुच्या व्यसनाधीन होऊन मुली बालिंची छेड काढली जाऊ शकते असे प्रकार होऊ नये म्हणून अगोदरच वरील व्यक्तीवर कडक कारवाई करण्याची स्थानिक पोलीस प्रशासनाने दखल घ्यावी... पोलीस प्रशासनाला दिलेल्या निवेदनावर ज्या लोकांनी सह्या केल्यात त्या व्यक्तींना सुद्धा हा व्यक्ती फोन करून धमक्या देत आहे की, तुम्ही अर्जावर सही कशी केलीत. तुम्हाला बघून घेतो. वरील व्यक्तीवर तातडीने कारवाई करून स्थानिक प्रशासन जनतेला दिलासा देऊन दारु विक्री समूळ नष्ट करणार का.. याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
प्रशासनाचा काना डोळा..?
