महाराष्ट्र वेदभुमी

शासकीय जागेवर रंगतात दारुड्यांच्या मैफिली

 


नेहरू मैदानासाठीचा 'कोटींचा खर्च दारुड्यांमुळे व्यर्थ'

सायंकाळच्या सुमारास मैदानावर लागतात दारुड्यांचे ठिय्ये

सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक:- चिमुकल्यांसह तरुणांसाठी क्रिकेटसह विविध खेळ खेळण्याचे, विविध क्रिकेट स्पर्धा भरविण्याचे तथा लोकांच्या मॉर्निंग तथा इव्हिनिंग वॉकसाठीचे एकमेव मैदान म्हणजे शहरातील नेहरू मैदान होय... नेमकी हीच गोष्ट हेरून की काय तर आमदार तथा राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी पुढाकार घेत करोडो रुपयांच्या निधीची तरतूद करून नुकतेच हे नेहरू मैदान सुसज्ज केलेले आहे असे असले तरी मात्र या नेहरू मैदानावर सुमारास दारुड्यांनी अक्षरशः उच्छाद मांडलेला आहे... येथे विशेषता सायंकाळच्या सुमारास आल्हाददायक वातावरणात दारुड्यांच्या मैफिली रंगत असून दारूच्या बॉटल्स ते इथेच फोडतात यामुळे येथे चिमुकल्याण सह तरुण खेळाडू व लोकांना जखमी होण्याची शक्यता बळावली आहे तेव्हा मैदानाच्या सुसजतेसाठी खर्च केलेला कोटींचा निधी व्यर्थ जाईल काय असा प्रश्न प्रामुख्याने येथे उपस्थित झालेला आहे...

याच मैदानावर विविध भव्य असे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडत असतात २६ जानेवारीचा शाळकरी मुलांचा कार्यक्रमही याच मैदानावर पार पडतो यावेळी येथे व्हिडिओ तहसीलदार असे वरिष्ठ अधिकारी येत असतात नुकताच या मैदानावर राम वन गमन चा कार्यक्रम पार पडला त्यावेळी येथे बाहेरील विविध कलाकारांसह स्थानिक राजकीय व नागरिक आलेले होते त्यापूर्वी काही महिन्यांपूर्वी आमदार तथा राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या पुढाकारातून येथे रामायण महोत्सवाचा भव्य असा कार्यक्रम झाला होता त्यावेळी येथे सीने अभिनेता पुनीत इस्सार यांचे रामायण महानाट्य पार पडले होते याच दिवशी प्रसिद्ध गायिका शहनाज अख्तर दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध गायक उदित नारायण तथा त्यांचा मुलगा आदित्य नारायण तथा तिसऱ्या दिवशी प्रसिद्ध गायक सुखविंदर सिंग ही कलाकार मंडळी येथे आली होती तेव्हा कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी विविध राजकीय मंडळी तथा हजारो नागरिक येथे आले होते एकंदरीत शहरातील हे मैदान मोठे व सुसज्ज असून खूप महत्त्वाचे मानले जाते मात्र सध्या घडीला दारुड्यांनी या मैदानाला विदृप करण्याचे कटकारस्थान चालविले आहे कदाचित ही गंभीर बाब मंत्री महोदय तथा पोलीस प्रशासनासाठी अनभिज्ञ असावी मात्र याकडे मंत्री महोदय तथा पोलीस प्रशासनाने गंभीरतेने लक्ष देण्याची आज नितांत गरज असल्याचे नागरिकांसह खेळाडू व क्रीडा प्रेमींकडून बोलल्या जात आहे...

मैदानात दृष्टीपथास पडलेल्या दारुड्यांवर कडक कारवाई करण्याची गरज

मैदानाची विशेषता म्हणजे या मैदानाला मंत्री महोदय आशिष जयस्वाल यांनी आपल्या कल्पकतेतून तथा स्वतः तेथे जाऊ जाऊ मार्गदर्शक सूचना सुचवून एका भव्य स्टेडियम सारखे तयार केलेले आहे... मैदानाची सुसज्जता पाहता साहजिकच याला कितीतरी कोटी रुपयांचा निधी सहज लागलेला असेल हे दिसून पडते काही विशेष बाबी दृष्टीसमोर ठेवून मंत्री महोदयांनी या मैदानाला एवढ्या सुंदर स्वरूपात सुसज्ज केले असेल यात शंका नाही... मात्र शोकांतिका अशी की कोटींचा खर्च करून सुंदर तथा सुसज्ज केलेल्या या नेहरू मैदानाला सध्या दारुड्यांचे ग्रहण लागलेले आहे. स्थानिक पोलीस प्रशासनाने कमीत कमी पंधरा दिवस तरी सायंकाळच्या सुमारास येथे दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावून दृष्टीपथास पडलेल्या दारुड्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी क्रीडा प्रेमींसह खेळाडू व नागरिकांकडून होत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post