महाराष्ट्र वेदभुमी

माजी आमदार रेड्डी यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

 


स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या - रेड्डी

सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक :-राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासक राज सुरु आहे... अनेक महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत आणि जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये ३ ते ४ वर्षांपासून निवडणुका झालेल्या नाहीत... नगर परिषद अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात आलेल्या नाहीत... जनप्रतिनिधी नसल्यामुळे प्रशासनावर कुणाचाही वचक नाही... प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी मनमानी करून सामान्यांना त्रास देत आहेत...

लोकसभेपाठोपाठ राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या.. त्यानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याच्या हालचाली सुरु होतील, अशी अपेक्षा होती... परंतु सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पुढे ढकलण्यात आली... त्यामुळे या निवडणुका पुन्हा एकदा पुढे ढकलल्या आहे...

स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडनुका लवकरात लवकर घेण्यात यावे अशा आशयाचे पत्र नुकतेच माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस यांना दिलेले आहे याबाबतची माहिती त्यांनी नुकत्याच एका पत्र परिषदेत दिली...

 पत्रात नागपुर जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगर पालीका, नगर परिषद, नगर पंचायत चे निवडनुका मागील दोन वर्षांपासुन प्रलंबित असुन जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या स्थानिक लोंकाची ही समस्या सोडविण्यात यावी असेही रेड्डी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात नमूद आहे. त्याचप्रमाणे लोकांचे समाधान करण्याकरीता तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे विविध समस्यांबाबत पाठपुरावा करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी मोलाची भूमिका बजावू शकतात. त्याचप्रमाणे शासनाच्या विविध लोक उपयोगी योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकप्रतिनिधींची आवश्यकता असते त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घेण्यात याव्या अशी मागणी माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात केलेली आहे..

होळी स्नेह मिलनच्या कार्यक्रमाचे आयोजन

माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी नुकतेच होळी स्नेह मिलन या कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते... होळी स्नेहमिलन कार्यक्रमानिमित्त भाजपा कार्यकर्ते एकत्र आले व त्यांना माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी याप्रसंगी होळीनिमित्त शुभेच्या दिल्या...होळीच्या रंगपंचमीच्या निमित्याने रामटेक विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी तर्फे होली स्नेहमिलन कार्यक्रम रामटेक येथील वृंदावन सेलिब्रेशन,लॉन येथे संपन्न झाले... कार्यक्रमाला भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य, माजी जिल्हाध्यक्ष राजीव पोतदार उपस्थित होते. होळी मिलन कार्यक्रमाला उपस्थित भाजपा कार्यकर्ते एकमेकांना  गुलाल लाऊन होळीच्या शुभेच्या दिल्या... याप्रसंगी रामटेक विधानसभा क्षेत्रातील भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post