महाराष्ट्र वेदभुमी

महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजना केंद्र,नागपूर (MRSAC),मृद व जलसंधारण विभाग,महाराष्ट्र सरकार यांच्यात सामंजस्य करार


नागपूर प्रतिनिधी :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र, नागपूर (MRSAC) आणि मृद व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र सरकार यांच्यात सामंजस्य करार झाला..

 या करारांतर्गत पुढील बाबींचा समावेश आहे :

✅राज्यातील मागील २०-२५ वर्षात विविध विभागांमार्फत, विविध योजनांतर्गत मोठ्या प्रमाणावर मृद व जलसंधारणाच्या झालेल्या कामांच्या संरचनांचे मॅपिंग व पडताळणी करणे

✅सॅटेलाईट डेटा व विविध योजनांखालील उपलब्ध डेटाच्या आधारे संरचनांची भौगोलिक स्थाने नकाशावर चिन्हांकित करण्यासाठी वेब पोर्टल व मोबाइल ॲप तयार करणे

✅शिवार फेरीच्या आधारे या सर्व संरचनांची सद्यस्थिती समजून घेऊन त्याची नोंद ॲपद्वारे घेऊन भविष्यात जलयुक्त शिवार ३.० साठी देखभाल, दुरुस्ती आदी कामांचा नियोजन आराखडा बनविणे

✅भविष्यात होणारी नवीन कामे तसेच देखभाल, दुरुस्तीची कामे याची नोंद ठेवणे

यावेळी महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्राचे पदाधिकारी आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post