महाराष्ट्र वेदभुमी

तिर्थक्षेत्र रामटेक गडमंदिराच्या विकासाला ग्रहण

 

मुख्यमंत्र्यांचे शब्द फोल ठरणार काय....

दिडशे कोटींचा प्रस्ताव मंजुर, अपुऱ्या निधीमुळे विकासकामे थंडबस्त्यात

सचिन चौरसिया प्रतिनिधी 

रामटेक :- अयोध्या, वाराणसी, शेगाव, शिर्डी आणि इतर प्रमुख मंदिरांप्रमाणेच, रामटेक क्षेत्राचा विकास करणे सुद्धा महत्वाचे आहे...

या रामनगरीला प्रभु श्रीरामाच्या पदस्पर्शाचा ऐतिह्यासीक वारसा लाभलेला आहे... २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्या मधील राम मंदिराचे उद्घाटन झाले... २२ जानेवारी २०२४ रोजी रामटेक गडमंदिर येथेही कार्यक्रम साजरा करण्यात आला मात्र रामटेक गडमंदिराच्या विकासात ग्रहण लागलेले आहे...

रामटेक परिसर नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेला आहे. श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने हा परिसर पावन झालेला आहे. कविकुलगुरू कालिदास येथील सौंदर्याने आणि पावित्र्याने भारावून गेला. येथे श्रीराम, सीता व लक्ष्मण यांच्या देवळांसह ऐतिहासिक त्रिविक्रम, वराह, केवल नृसिंह, रुद्र नृसिंह, भोगराम, गुप्तराम आदींचेही देवळे आहेत. येथे पवित्र अंबाळा तलावही आहे. या सर्वांचा विकास व्हावा आणि रामटेकला आलेला पर्यटक, तीर्थयात्रेकरू सुखावून जावा म्हणून महाराष्ट्र शासनाने २१ मे २०१८ रोजी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मंजुरी दिली... 

असे असतांनाही मात्र प्राचीन तथा ऐतीह्यासिक वारसा लाभलेल्या रामटेक तीर्थक्षेत्राच्या विकासाकडे लक्ष न दिले जाणे आश्चर्यचकित करणारी बाब आहे. माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस हे यापूर्वी २०१७ मध्ये मुख्यमंत्री असतांना त्यांना देण्यात आलेल्या पत्रात त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री फडणविस यांचे लक्ष वेधले होते रामटेक क्षेत्राच्या विकासासाठी १५० कोटी रुपयांच्या तिर्थक्षेत्र विकास प्रस्तावास मंजुरी देण्यात आली होती मात्र निधी अद्यापही रामटेकला पूर्णपणे मिळालेला नाही...

रामटेक क्षेत्राच्या विकासासाठी राज्य सरकारने २१ मे २०१८ रोजी तीर्थयात्रा विकासाच्या प्रस्तावासाठी १५० कोटींना मान्यता दिली होती. मात्र काम सुरू झाले आणि सरकार बदलले... हे काम आता कासव गतीने सुरू आहे. पहिला हप्ता म्हणुन ४९.२८ कोटी मंजूर रकमेचे काम सुरू झाले... सन २०१८ पासून गडमंदीर गेट चे काम सुरू आहे मात्र ते अपूर्ण आहे...  माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांनी स्वत:च्या खर्चाने बनविलेले प्रवेशद्वार सध्या रामटेकचा गौरव वाढवत आहे... वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी म्हटले आहे की रामटेकच्या विकासासाठी २०० कोटी पेक्षा जास्त रक्कम मंजूर झाली आहे... यासह, रोप वे मंजूर असल्याचे म्हटले आहे, परंतु काम अद्यापही सुरू झाले नाही. मंदिराच्या यात्रा निवासस्थानाचे काम ५ वर्षांपासून सुरू झाले आहे जे अद्याप पूर्ण झाले नाही... राम मंदिर पुरातत्व विभागाच्या अंतर्गत आहे आणि विभागाचे याकडे लक्ष नाही. वराह प्रवेशद्वार आणि राम मंदिराच्या मुख्य भैरव प्रवेशद्वारामध्ये तडे गेले आहेत... त्यांना लोखंडाचा तात्पुरता आधार दिला गेला आहे. प्रवेशद्वाराचे लाकडाचे दरवाजे सडलेले आहेत... मंदिराचा इतिहास सांगण्यासाठी सिमेंट चे चबुतरे तयार केले गेले होते, परंतु मंदिराचा इतिहास लिहिलेला नाही. गडमंदीराच्या पायऱ्यांचे दगड बाहेर येत आहेत... प्रवेशद्वारांवर झाडे वाढली आहेत. पुरातत्व विभाग याकडे लक्ष देत नाही... तेव्हा यातून विकास कसा होईल हे एक प्रश्नचिन्ह आहे...

Post a Comment

Previous Post Next Post