महाराष्ट्र वेदभुमी

वसंत ऋतुत केशरी रंगाची नैसर्गिक उधळण...


रंगोत्सव सुरु झाला, वसंत ऋतुच्या स्वागतासाठी पळस नटला 

सचिन चौरसिया प्रतिनिधी 

रामटेक:- तालुक्यातील पवनी, देवलापार रस्त्यावर वन विभागाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात पळसाची झाडे आहेत... ही पळसाची झाडे गर्द केशरी रंगांच्या फुलांनी बहरली असून, ये-जा करणाऱ्या लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत...

वसंताचे आगमन होताच रानावनात चाहूल लागते ती पानगळीसह विविध उमलणाऱ्या फुलांची... त्यात लाल, केशरी रंगांची मनसोक्त उधळण करणारा पळस सर्वांच्या नजरेला खेचणारा ठरतो... 

उन्हाळा सुरु झाला असला तरी थंडी अजूनही अंगात असल्यासारखी जाणवत आहे... तर शिशिर ऋतू मावळून आता वसंत बहरायला सुरुवात झाली आहे.. अशातच ठिकठिकाणी पळसाची फुलं रंग उधळताना दिसत आहेत... पळस म्हणजे पलाश वृक्ष.. वसंत ऋतूत फुललेल्या पळसाचं झाड सर्वांचंच लक्ष वेधून घेतंय.. रामटेक तालुक्यातील विविध भागात बहरलेली पळसाची झाडे अनेकांना मोहवून टाकत आहेत... उन्हाळा सुरू झाला की, झाडांना पानगळ लागते आणि निष्पर्ण वृक्षांचे सांगाडे पाहवयास मिळतात... अशावेळी उन्हाळ्यातही काही झाडं बहरत असतात... यातलाच एक पळस केशरी जर्द पळस आपले लक्ष वेधून घेतो...

पळसाच्या फूलामध्ये आयुर्वेदिक महत्त्व

प्राचीन काळापासून पळसाचा आयुर्वेदिक औषधी वनस्पती म्हणूनही वापर होत असे... पळसाची फुले पाण्यात टाकून स्नान केले, तर त्वचारोग नाहीसा होतो, असे आयुर्वेदात म्हटले आहे... पळसाची फुले ही सेंद्रिय रंगांसाठी जगभर प्रसिद्ध आहेत... फुलांशिवाय पळसाच्या बिया, पाने, साल, मुळे आणि लाकूड यांचाही वापर केला जातो... आयुर्वेदिक पावडर आणि त्यापासून बनवलेले तेलही चांगल्या दरात विकले जाते...

Post a Comment

Previous Post Next Post