महाराष्ट्र वेदभुमी

केळवणे गावात शिवजयंतीच्या औचित्ताने गाजले शिवकार्याचे पर्व

केळवणे प्रतिनिधी(सुशील पाटील) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमान छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अखंड हिंदुस्थानासह संपूर्ण जगामध्ये साजरी केली जाते...

केळवणे गावातही मोठ्या उत्साहाने प्रतिवर्षीप्रमाणे जय महाराष्ट्र ग्रुप आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५वी जयंती  साजरी करण्यात आली... 

सदरील कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामपंचायत केळवणे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य तसेच कर्मचारी, गावातील सर्व ग्रुप व मंडळांचे सदस्य, तरुण मंडळी, ज्येष्ठ नागरिक, उपस्थित होते... सकाळी ६.३०ला ब्राम्हणांच्या हस्ते गणेश पूजन, छत्रपती शिवाजी महाराज लहान पुतळ्याचे पूजन तसेच महाराज्यांच्या अश्वारूढ स्मारकाचे दुधाभिषेख व जलाभिषेख करून महाराज्यांच्या स्मारकास पुष्पहार घालण्यात आला... गावाचे सरपंच प्रतिष्ठित नागरिक, ग्रुपचे सदस्य, ज्येष्ठ मंडळींच्या हस्ते विधिवत पूजा करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने गारद देण्यात आली... महाराजांची आरती करून प्रसाद व श्रीफळ वाढण्यात आले...  

कोकण एज्युकेशन सोसायटी हायस्कूल केळवणेतील मुख्याध्यापक श्री. डोळे सर, सर्व शिक्षकांच्या हस्ते महाराजांच्या स्मारकाचे पूजन तसेच हायस्कूलच्या मुलांनी भव्य मिरवणुकीत  लेझिम नृत्य तसेच महाराज्यांच्या जीवनावर उत्कृष्ठ भाषण, महाराजांची गारद, पोवाडा गायन केले...मुलांना बक्षिस, चॉकलेट देण्यात आले...

 दोन दिवसांपूर्वीच गावातील ट्रेकर ग्रुपकडून छत्रपती शिवरायांचे अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण सोहळा शिवकालीन १२व्या वंशजांच्या साक्षीने साजरा झाला होता...

 तसेच महाराज्यांच्या स्मारकासमोर गावातील पत्रकार, लेखक, कवी, साहित्यिक श्री.अजय शिवकर यांच्या विचारसरणीतून तसेच केळवणे हिंदू जनजागृती यांच्या सहाय्याने श्रीमद भगवद्गीता वाटप करण्यात आली... मराठी शाळेतील मुलांची भाषणं झाली त्यांना जय महाराष्ट्र ग्रुपच्या वतीने बक्षीस दिली.. केळवणे गावात शिवकार्याच्या विविध कार्याने संपूर्ण परिसर हर्ष जल्लोष आनंदाने शिवमय झाला होता...

Post a Comment

Previous Post Next Post