किटसमध्ये वार्षिक क्रीडा पुरस्कार वितरण समारोह साजरा
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक:- कविकुलगुरु इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलाजी अण्ड सायंस (किट्स) रामटेक मध्ये २१ फेब्रुवारी २०२५ला वार्षिक क्रीडा पुरस्कार वितरण समारोह संपन्न झाला... कार्यक्रमाचे उद्घाटन संस्था सचिव व्ही. श्रीनिवास राव यांचे हस्ते करण्यात आले... प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे, विद्यार्थी डीन डॉ. पंकज आष्टणकर, विद्यार्थी क्रिडा प्रतिनिधी पृथ्वीश पदमावर व प्रतीक्षा भोकरे, विभाग प्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते...मार्गदर्शन करताना संस्था सचिव व्ही. श्रीनिवास राव म्हणाले की,अभ्यासाबरोबर विविध खेळ खेळने तेव्हढच महत्वाचे आहे... सांघिक खेळाने विद्यार्थ्यांमधे शिस्त येते, व्यक्तिगत सुधारना होते... भविष्यात विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळतील. प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे म्हणाले की विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत विविध खेळांचा छंद सातत्याने ठेवावा... खेळामध्ये जिंकणे याही पेक्षा सहभागी होणे महत्वाचे आहे... हार जीत सुरूच राहणार...
डीन डॉ. पंकज आष्टणकर यांनी प्रस्तावना केली... या वेळी विद्यार्थ्याना प्रशस्तीपत्र व स्मृति चिन्ह देण्यात आले... कार्यक्रम यशस्वीतेकरीता डीन, शारीरिक शिक्षण विभाग प्रभारी दिनेश जोशी, रफीक मालाधारी, धनराज मानकर यांचेसोबत सर्व क्रीड़ा विद्यार्थी व प्राध्यापकांनी प्रयत्न केले... कार्यक्रमाचे संचालन वैदेही कडू व हर्ष सहारे यानी केले... आभार प्रदर्शन प्रतीक्षा भोकारे यांनी केले...
