सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :- रामटेक तालुक्यातील हिवरा (पथरई) येथे गुरे चारायला गेलेल्या गुराख्यावर पट्टेदार वाघाने अचानक हल्ला करून जखमी केले. खेमराज वरखडे (वय ६०) असे जखमी गुराख्याचे नाव आहे... ही घटना शनिवार (दि.२२) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास देवलापार पोलीस स्टेशन हद्दतीत येणाऱ्या हिवरा (पथरई) मध्ये घडली... मात्र या घटनेने परिसरात दहशत पसरली आहे... पोलीस स्टेशन देवलापार हद्दीत येणाऱ्या हिवरा पथरई येथील खेमराज वरखडे (वय ६०) असे या जखमी गुरख्याचे नाव असून तो गावातील गुरे चारायला घेवून जवळचा शिवारात गेले असता, सायंकाळी ५ वाजता सुमारास परत येत असताना पट्टेदार वाघाने खेमराजवर हल्ला केला... यात ते गंभीर स्वरूपात जखमी झाले... सायंकाळ होताच सर्व जनावरे घरी परतले मात्र खेमराज गुराखी परत न आल्याने कुटुंबियांनी वनविभाग आणि पोलिसांच्या मदतीने शोध घेतला असता जंगलात खेमराज गंभीर जखमी होवून पडलेल्या अवस्थेत आढळून आले... त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय देवलापार येथे आणण्यात आले... प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले...
