महाराष्ट्र वेदभुमी

लायन्स क्लब कोलाड आणि एम जे एफ लायन विजय गणत्रा यांच्या सहकार्याने पाले खुर्द आदिवासीवाडीतील विद्यार्थ्यांना ब्लॅंकेट वाटप.

   पुगाव खांब (नंदकुमार कळमकर)

रोहा तालुक्यातील कोलाड परिसरातील पाले खुर्द  आदिवासीवाडी येथील रायगड जिल्हा परिषद शाळेतील २० विद्यार्थ्यांना लायन्स क्लब कोलाड तसेच एम जे एफ लायन विजयकुमार गणत्रा यांच्या विशेष सहकार्यातून येथील विद्यार्थी वर्गाला उबदार पांघरूनाचे ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले...

पत्रकार महादेव सरसंबे, यांच्या प्रमुख उपस्थितीत कोलाड लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ.मंगेश सानप, उपाध्यक्ष डॉ. श्यामभाऊ लोखंडे, शाळेचे मुख्याध्यापक आशिष पवार, सह शिक्षक रणजीत पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले...यावेळी बहुसंख्येने विद्यार्थी वर्ग उपस्थित होते...

लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३१ ए ४ यांच्या कृपाछत्राखाली तसेच क्लबचे संस्थापक अध्यक्ष डॉ सागर सानप यांच्या मार्गदर्शनाखाली गेली चार वर्षे अविरतपणे कोलाड विभाग परिसरात कोलाड लायन्स क्लब ही सेवा भावी संस्था सामजिक शैक्षणीक कला क्रिडा सांस्कृतिक आरोग्य पर्यावरण अशा विविध क्षेlत्रात काम करत ग्रामीण भागातील तळागाळातील गोर गरीब कष्टकरी शेतकरी जनतेच्या हितासाठी विविध उपक्रम राबवत असुन  लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ मंगेश सानप, सेक्रेटरी रविंद्र लोखंडे, खजिनदार राजेंदर कोप्पू, उपाध्यक्ष डॉ विनोद गांधी, डॉ श्याम लोखंडे, माजी अध्यक्ष नरेश बिरगावले, प्रा.डॉ. माधव आग्री सर, गजानन बामणे, नंदकुमार कळमकर, अलंकार खांडेकर, अनिल महाडिक, दिनकर सानप, विश्वास निकम, विठ्ठल सावळे, दिलीप मोहिते, यांच्यासह लायन्स क्लबचे सर्व पदाधिकारी व  सदस्य मेहनत घेत आहेत...

Post a Comment

Previous Post Next Post