महाराष्ट्र वेदभुमी

वडखळ येथील जय अंबे स्वीट मार्टचे मालक पप्पूसिंह शंकरसिंह राजपूत यांचे निधन

 


सोगाव - अब्दुल सोगावकर : पेण तालुक्यातील वडखळ नाका येथील प्रसिद्ध जय अंबे स्वीटमार्टचे मालक पप्पूसिंह शंकरसिंह राजपूत यांचे सोमवार दि. १७ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ११:३० च्या सुमारास पेण येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्यावर मंगळवार दि. १८ फेब्रुवारी २०२५ रोजी वडखळ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने वडखळ परिसरातील व्यापारी वर्ग व ग्राहकांनी हळहळ व्यक्त केली आहे...

     हसतमुख, मनमिळाऊ व प्रत्येक ग्राहकांच्या सोबत आदरातिथ्याने वागणे, ग्राहक हा राजा आहे, त्यांच्यासोबत सौजन्याने वागणे, हा त्यांचा स्वभाव होता, यामुळे ते सर्व व्यापारी वर्गात व ग्राहकांमध्ये सुपरिचित होते. पप्पूसिंह शंकरसिंह राजपूत हे गेली अडीच दशके वडखळ येथे जय अंबे स्वीटमार्ट द्वारे ग्राहकांना सर्व प्रकारची चविष्ट मिठाई, फरसाण विक्रीची सर्वोत्तम सेवा देत होते... 

    त्यांच्या पश्चात आई, दोन भाऊ, तीन बहिणी, पत्नी, तीन मुली त्यामध्ये दोन विवाहित मुली, एक मुलगा, दोन नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी बुधवार दि. २६ फेब्रुवारी २०२५ रोजी उद्धर-पाली येथे होणार आहेत, तर तेरावे शनिवार दि. १ मार्च २०२५ रोजी वडखळ येथील निवासस्थानी होणार आहेत...

Post a Comment

Previous Post Next Post