महाराष्ट्र वेदभुमी

फैज फारुख हाफिजचे आकस्मिक निधन;गरम तेलाची कढई अंगावर पडल्याने भाजले पोट



सोगाव येथील मोहम्मद फैज फारुख हाफिज याचे आकस्मिक निधन, पंचक्रोशीत हळहळ व्यक्त,

सोबतच्या विद्यार्थी मित्रांनी मोहम्मद फैजच्या कबरीवर जाऊन वाहिली श्रद्धांजली,

सोगाव -अब्दुल सोगावकर : अलिबाग तालुक्यातील सोगाव येथील कु. मोहम्मद फैज फारुख हाफिज(वय १३) याचे बुधवार दि. १२ फेब्रुवारी २०२५ रोजी आकस्मिक निधन झाले आहे...या आकस्मिक निधनाने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे...

   कु.मोहम्मद फैज फारुख हाफिज हा अलिबाग येथील सेंट मेरी शाळेचा ८ वी इयत्तेचा विद्यार्थी होता... तो शाळेतील एक हुशार विद्यार्थी होता, तसेच तो आपल्या कुटुंबासह सोगाव गावात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा लाडका होता... तो शुक्रवार दि. ७ फेब्रुवारी रोजी आपल्या घरात आईसोबत गरम तेलाच्या कढईत काही पदार्थ तळत असताना अचानक गरम तेलाची कढई अंगावर पडल्याने त्याच्या पोटावरील भाग काही प्रमाणात भाजले गेले होते, त्याच्यावर नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू होते... मात्र उपचार सुरू असताना बुधवार दि.१२ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी अचानक त्याची प्राणज्योत मालवली... त्याच्यावर रात्री उशिरा सोगाव येथील कब्रस्थानात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले...

 यावेळी मोहम्मद फैज फारूख हाफिज यांचे सर्व नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रपरिवार, त्याच्या शाळेतील विद्यार्थी, सर्व शिक्षक वर्ग तसेच पंचक्रोशीतील सर्व समाजातील लहान मुले, महिला व पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते... त्याच्या पश्चात आई, बाबा, दोन मोठ्या बहिणी, चार काका - काकी, आजी - आजोबा, मामा-मामी आदी मोठा परिवार आहे... मोहम्मद फैज याच्या अल्पवयातील निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे...

पहिल्या चित्रात : मोहम्मद फैज फारुख हाफिज याचा फोटो,

दुसऱ्या चित्रात : मोहम्मद फैज फारुख हाफिज याच्या कबरीवर श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित वर्गमित्र,

Post a Comment

Previous Post Next Post