सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :- पारशिवनी पोलीस ठाण्या अंतर्गत सिगोंरी येथील अभिजित देवेंद्र ढोके वय १९ वर्ष रा.सिगोंरी यांनी आपल्या सख्ख्या भावाचा लाकडी दांड्याने प्रहार करून हत्या केली...पारशिवनी पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्रात सिगोंरी या गावातील अभिजित व अजिंक्य हे दोन भाऊ दिनांक २० फेब्रुवारी २५ रात्री १० च्या सुमारास आरोपी अभिजित देवेंद्र ढोके तर मृतक अजिंक्य देवेंद्र ढोके यांनी कामावर गेल्यावर वडिलांना जेवण का बनवले नाही... या कारणावरून शिवीगाळ केली...यावरून आरोपीने अजिंक्य काम करत असलेल्या ठिकाणी येऊन वडिलांना शिव्या का दिली...या कारणांवरून जवळील लाकडी दांड्याने मृतकाचे डोक्यावर व पाठीवर जबर मारहाण केली...व त्यास जखमी केले... मृतक अजिंक्य ढोके यास जखमी अवस्थेत नागपूर मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला...फिर्यादी हर्षल नंदू टोंगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पारशिवनी पोलीसांनी आरोपी अभिजित देवेंद्र ढोके रा.सिगोंरी यांच्या विरोधात अपराध क्रं. ५७/२५ कलम १०३ (१) बी एन एस नुसार गुन्हा नोंद करण्यात आला... विभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते व ठाणेदार राजेशकुमार थोरात यांनी घटनास्थळी भेट देवून चौकशी केली... पुढील चौकशी ठाणेदार राजेशकुमार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पृथ्वीराज चव्हाण मुदद व पोलिस करीत आहेत... यातील आरोपी अभिजित देवेंद्र ढोके यास मात्र बातमी लिहीत पर्यंत अटक झाली नव्हती...
