मुलुंड प्रतिनीधी : सतिश वि.पाटील
मुलुंड पोलिस ठाणे परिमंडळ 7 च्या माध्यमातून जनता व पोलिस यांची संयुक्त बैठक व मार्गदर्शन मुलुंडमध्ये वेळोवेळी करण्यात आले
.
1) रोटरीक्लब
2) मुलुंड काॅलनी
3) नाहूर अशोक नगर
पोलिस चौकी बीट 3
4)विकास सेंटर
असे जन जागृती अभियान राबविण्यात आले मार्गदर्शन करण्यात आले नवीन तीन कायदे जनसामान्यांपर्यंत प्रसार व माहीती प्रोजेक्टरच्या माध्यमातून देण्यात आली मुलुंड पोलिस परिमंडळ 7 डीसीपी मा.विजयकांत सागर मुलुंड विभाग एसीपी संदीप मोरे मुलुंड पोलिस ठाण्याचे पोलीस वरिष्ठ निरीक्षक निरीक्षक श्री.अजय जोशीसर पोलीस निरीक्षक श्री.कोकाटे सर व पोलिस उपनिरीक्षक श्री.बोरसे सर यांनी सायबर क्राईम जन जागृती केली तसेच जनसंपर्क साधून भ्रृण हत्या व "बेटी बचाव बेटी पढाव"या अनुषंगाने रॅली काढण्यात आली... पोलिस व सामान्य नागरिक यांची सांगड घालून दिली अनेक प्रश्न व उत्तरे योग्य रितीने सोडवण्यात आले, महीला सुरक्षा, अन्याय ,नशामुक्ती यावर मार्गदर्शन झाले .पोलिस हा देखिल एक माणूसच आहे फक्त कायदेशीर हक्क व संरक्षण यांनी याचे पालन करण्यात समर्थ असतात... जनजागृतीपर कार्यक्रमात पत्रकार श्री.सतिश वि.पाटील तसेच भावना राजवाडा, प्रभाकर कांबळी आर पी आय व मुलुंड मधील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते...
