महाराष्ट्र वेदभुमी

किट्समध्ये भारतीय संविधान समोरील आव्हान वर व्याखान

शहरी नक्षलवाद पासू‌न सावधान राहा-: पराग रामटेके

सचिन चौरसिया प्रतिनिधी 

रामटेकः कविकुलगुरु इंस्टिट्यूट ऑफ टेक्नालाजी अण्ड सायंस (किट्स) रामटेक मध्ये नुकताच सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग व  विशेष पोलिस महानिरीक्षक विभागाच्या संयुक्त विद्यमानने संविधान अमृत महोत्सव 2024-25 च्या विविध उपक्रमा अंतर्गत घर घर संविधान व संविधान समोरील आव्हानबद्दल प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला...

यावेळी प्रामुख्याने विशेष पोलिस महानिरिक्षक कार्यालयचे सहाय्यक पुलिस निरिक्षक जितेंद्र वैरागडे, पराग रामटेके व स्मिता सोनवाने तसेच समाज कल्याण विभागाचे निरीक्षक पराग वासनिकर, सहाय्यक निलेश बोबडे, किट्स शिष्यवृत्ती विभागचे  डॉ. महेश मावळे सहित प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते... प्रमुख वक्ते, सहाय्यक उपनिरिक्षक पराग रामटेके  प्रबोधन पर म्हणाले की जगात लोकशाही असलेल्या भारताचे संविधान लिखित जगात सर्वोत्कृष्ट आहे... संविधानाने प्रत्येक नागरीकाला समानतेच्या व स्वातंत्रतेच्या अधिकार,  लोकशाही, कायद्याचे राज्य, मुलभूत अधिकार दिले आहेत... परंतू पाकिस्तान प्रायोजीत इस्लामिक दहशतवाद, सिमांत राज्यात सुरु असलेल्या विघटनकारी चळवळी, देशा अंतर्गत सुरु असलेल्या विघटनकारी नक्षलवाद व माओवाद मुळे संविधानाला धोका निर्माण झाला आहे. शासन व सुरक्षा व्यवस्थला मोठे आव्हान निर्माण केले आहे... सरकारच्या कठोर प्रयत्नमुळे जंगली  नक्षलवाद शेवटच्या श्वास घेत आहे... परंतू शहरी नक्षलवाद देशान्तर्गत सुरक्षा व्यवस्थेला मोठे आव्हान निर्माण झाले आहे... नागरीकांच्या मुलाभूत अधिकराला मोठे आव्हान निर्माण झाले आहे... ते म्हणाले की विद्यार्थ्यांनी शहरी नक्षलवाद‌पासून सावध राहावे... कार्यक्रमाकरिता संस्था सचिव व्ही. श्रीनीवासराव  व प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे यांचे विशेष सहकार्य लाभले... प्रस्तावना पराग वासनिकर, धन्यवाद व संचालन डॉ. महेश मावले यांनी केले...

Post a Comment

Previous Post Next Post