महाराष्ट्र वेदभुमी

रोहा ता.ग्रा.पंचायत शेडसई सदस्य,आई एकवीरा हॉटेल मालक तानाजी म्हात्रेंना मातृ शोक

 

रोहा प्रतिनिधी नंदेश गायकर... रायगड जिल्ह्यातील नामांकित अशी रोहा तालुक्यातील ग्राम पंचायत शेड सई चे सदस्य तथा आई एकवीरा हॉटेल चे मालक यांच्या मातोश्री गं. भा. येसूबाई देवजी म्हात्रे या तारीख ३फेब्रुवारी २०२५ रोजी वृध्दप कालाने  निधन झाले... मनमिळावू  आणि मायाळू स्वभावाची माय हरपली.. थोरा मोठ्यांना हेवा वाटावा असा पुण्यवान आत्मा अनंतात विलिन झाला.. त्याचवेळी सर्वांच्या डोळ्यात अश्रू वाहत होते...

भागीरथी खारचे ग्रामस्थ, म्हात्रे कुटुंबीय तसेच भागिरथी खार महिला यासकडून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली....त्यांच्या अंत विधीस आजूबाजूच्या परिसरातील असंख्य जनसमुदाय उपस्थित होता...त्यांच्या पश्चात त्यांना ५मुले १मुलगी,नातवंडे, भाऊ, बहिणी असा मोठा परिवार आहे.... तसेच त्यांचा दशक्रिया विधी तारीख १४फेब्रु२०२५ स.१० वा रोहा तालुका गोफण रेतीबंदर येथे होणार आहे...

Post a Comment

Previous Post Next Post