महाराष्ट्र वेदभुमी

पनवेलचे गायक,दिग्दर्शक तेजस पाटीलने लोकनेते दि.बा.पाटील जन्म शताब्दी निमित्त केला सन्मान सोहळा



एकविरा कला क्रिडा सामाजिक आणि शैक्षणिक संस्था पनवेल  आणि श्री.बी.के.पाटील फाउंडेशन केळवणेचा "भूमिपुत्र ,भुमीकन्या सन्मान २०२५" संपन्न 

पनवेल वार्ताहर :-  कला, क्रीडा, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या  एकविरा संस्था व श्री.बी. के. फाउंडेशन, केळवणे ( पनवेल ) यांच्यातर्फे आगरी कोळी समाजातील " भूमिपुत्र व भूमिकन्या सन्मान सोहळा  2025 " कामोठे, पनवेल येथे मोठ्या उत्साहात पार पडला...

  यावेळी व्यासपीठावर आ प्रशांत ठाकूर , जे.डी.तांडेल, "सुपली सोन्याची" फेम गायिका भागीरथी कोळी, ह.भ.प. प्रकाश महाराज पाटील , पल्लवी परब क्राईम ब्रँच, भाजपा महिला आघाडीच्या वनिता पाटील, दत्ता भोईर प्रा. भूमिका म्हात्रे , कलाकार धीरज शिंदे, कलाकार नाँडी रसाळ माजी नगरसेवक विकास घरत ,रवींद्र जोशी, सामाजिक कार्यकर्त्या छाया म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते...

     व्यासपीठाच्या बाजूलाच आगरी संस्कृती, मासेमारीचे  खरेखुरे प्रदर्शन, तोच धागा पकडून आ. प्रशांत ठाकूर यांनी आगरी समाज बांधवांना आपली संस्कृती टिकविण्याचे आवाहन केले...  ते पुढे म्हणाले , शहरी करणाच्या विकासामुळे गावाचं स्वरूप पूर्णतः बदलून गेलेय... आधुनिक यंत्र,  मिक्सरच्या जमान्यात वाटण, त्यामुळे वाटण्याचा पाटा लोप पावलाय.... मिठागरंही, मच्छिमारी बंद होत चाललीत.. त्यामुळे पुढील पिढीला , अशी होती बंदरे , पारंपारिक मच्छिमारी , अशी होती शेतीची कामे हे केवळ पुस्तकातूनच पहायला मिळेल....म्हणूनच संस्कृती जपणे आवश्यक असल्याचे सांगून ठाकूर यांनी आगरी समाजाचे कैवारी दि.  बा. पाटील यांच्या योगदानाचा आवर्जून उल्लेख करून त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले...

   भूमिपुत्र सन्मान मध्ये श्रीवर्धनचे सिद्धेश रघुवीर , किशोर  शिनाळे , पोलीस दलातील अमिषा म्हात्रे , मुरबाडचे कवी हरिश्चंद्र दळवी, वसईचे पत्रकार नरेंद्र एच. पाटील, व  कला शिक्षिका अक्षता पाटील , पनवेल, अभिनेत्री रजनी मढेकर, अनंत जितेकर,कामोठे चे युवानेते वृषभ गोंधळी,  भिवंडीचे कवी नितुराज पाटील, गायिका धनश्री पाटील , अमिषा पाटील, तसेच मीठ पिकविणारे शेतकरी कुटुंब यांचा सन्मान करण्यात आला... 

          संस्थेचे अध्यक्ष तेजस पाटील यांनी आपले मनोगत मांडताना अनेक सामाजिक, शैक्षणिक उपक्रम  राबवून नवोदितांना व्यासपीठ मिळवून देऊन त्यांचे मनोधेर्य वाढविण्यासाठी एकविरा संस्थेची स्थापना करण्यात आल्याचे सांगितले, तसेच संस्थेने आजवर अनेक कलाकार घडविल्याचा सार्थ अभिमान असल्याचे देखील त्यांनी सांगितले... कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच एकविरा देवीची पालखी वाजत गाजत व्यास पिठावर आणण्यात आली..., तसेच गायिका भागीरथी कोळी यांच्या 'सुफली सोन्याची' व गायिका धनश्री पाटील एकविरा गीत गाण्यावर सर्वानीच ताल धरला..त्यामुळे एक वेगळीच रंगत पहायला मिळाली...या कार्यक्रमाचे सूत्र संचालन अमित पाटील यांनी केले...

Post a Comment

Previous Post Next Post