महाराष्ट्र वेदभुमी

स्त्रीशक्तीचा जागर... आदिती महोत्सव !

 


श्रीवर्धन प्रतिनिधी :- श्रीवर्धन शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने स्त्रीशक्तीचा जागर करणारा भव्य असा "आदिती महोत्सव" आयोजित करण्यात आला...

या महोत्सवाच्या निमित्ताने हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासह "जल्लोष नारी शक्तीचा" या सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले... तालुक्यातील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री हे या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले... यावेळी मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री रश्मी अनपट यांचीही उपस्थिती लाभली...

पक्ष संघटनेतील आपल्या सहकारी संस्कृतीच्या संवर्धनासह महिलांच्या सक्षमीकरणासाठी सक्रिय आहेत याचा खरोखर अभिमान वाटला, या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन... "आपल्या माता-भगिनींचे सक्षमीकरण हेच सर्वोत्तम वाण" हा संदेश देत श्रीवर्धन शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राबवलेला हा उपक्रम खरोखर स्तुत्य व अनुकरणीय..

Post a Comment

Previous Post Next Post