कोलाड (श्याम लोखंडे) रोहा तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा संभे शाळेत सामाजिक कार्यकर्ते संजय सानप व प्रशांत सानप यांच्या विशेष प्रयत्नांतून व पोस्को आय एस डी सी आणि अक्वायेर व्हेंचर प्रा. लिमिटेड यांच्या सौजन्याने विद्यार्थी वर्गाला पिण्याच्या शुद्ध पाण्याची सुविधा म्हणून वॉटर कुलर तसेच बदलत्या संगणकीय युगात विद्यार्थ्यांना प्रगत शिक्षणासाठी मोठी एल ई डी टीव्ही सोबतच संगणक सुविधेचे वाटप करण्यात आले...
जागतीक स्तरावर उद्योग व्यवसायात नामांकित असलेल्या पोस्को आय एस डी सी कंपनीच्या विशेष सौजन्याने ग्रामीण भागातील संभे शाळेला संगणक आणि वॉटर कुलर भेट देऊन त्यांचे शुभारंभ विद्यार्थी वर्गासमावेत कंपनीचे कोरियन व्यवस्थापक एम.डी.मंकीचुन,अक्वायेर व्हेंचर प्रा.लि.चे मालक डॉ.प्रियांक नायर, यांच्या शुभ हस्ते करण्यात आले...
या गावचे सुपुत्र माजी आमदार स्व.पा.रा.सानप यांच्या तिसाव्या पुण्यस्मरण सोहळ्याचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी मॅनेजर टीम लीडर निलेश चिखले,सुधिर भोसले, प्रशांत सानप,माजी उपसरपंच संजय सानप, पत्रकार डॉ. श्याम लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते दिवाण सानप, हभप नारायण महाराज दहिंबेकर, पोलीस पाटील अनंत सानप, पांडूरंग सानप, होनाजी सानप, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ प्रिया पवार, रेश्मा जमादार सह शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, अंगणवाडी सेविका, संभे ग्रामस्थ आदी शाळेतील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते...
बदलत्या काळात संगणकीय युगात विद्यार्थ्यांना प्रगत शिक्षण उपलब्ध व्हावे तसेच त्यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी गावातील युवक तसेच या शाळेचा माजी विद्यार्थी प्रशांत सानप त्यांनी त्यांच्या कंपनीशी जवळीक साधून या सुविधा उपलब्ध करून दिल्या तसेच मागिल अनेक वर्ष पोस्को आय एस डी सी यांच्या मार्फत गावासाठी विविध प्रकारची मदत सदैव लाभत असल्याने त्यांच्या या उपक्रमाचे ऋण संजय सानप यांनी व्यक्त केले...
तर प्रमुख पाहुणे कंपनीचे कोरियन व्यवस्थापक एम डी मंकीचुन यांनी आपल्या मनोगतात शाळेतील चिमुकल्यांचे कौतुक करत शाळा अतिशय सुंदर असल्याचा मनस्वी आनंद व्यक्त करत विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना आणि विचार करत असताना अतिशय ऊर्ज्यात्मक विचार केला पाहिजे कुठेही नकारात्मक विचारांची भावना मनात बाळगू नये जीवनात जे कार्य तुम्ही कराल ते ऊर्ज्यात्मक आणि आध्यात्मिक असेल तर तुम्ही पुढे जाऊन यशस्वी व्हाल...
प्रसंगी पाहुण्याचे स्वागत व सदरच्या कार्यक्रमाचे प्रस्ताविक संजय सानप यांनी केले तर सूत्रसंचालन शाळेच्या मुख्याध्यापिका प्रिया पवार यांनी करून आभाराने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली...
