रोहा प्रतिनिधी -: भाग्येश घोसाळकर
रोहा - घोसाळे हायस्कूल बॅच १९९६-९७ या वर्षी पनवेल येथे स्नेह मेळावा आयोजित केला होता... एकत्र भेटणे, सामाजिक कार्य, नोकरी, व्यवसाय करून वर्षातून एकदा धम्माल,मस्ती, एन्जॉय करण्याचा दिवस म्हणजे स्नेह मेळावा...
माजी विद्यार्थी बॅच १९९६-९७ मागील पाच वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेत आहेत. मागील वर्षी सामाजिक कार्य करत असताना परिवर्तन सामाजिक संस्था या संस्थेची स्थापना करून नोंदणीकृत संस्थेच्या माध्यमातून करून सामाजिक कार्य करण्याचे आमचे काम चालू आहे व यापुढेही उत्तरोत्तर तालुकास्तरावर चालू राहील...आगामी काळात राबवणाऱ्या योजना, शासकीय माहिती, योजना लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना जागृत करणे, सामाजिक कार्यक्रम राबविणे, तसेच न्याय देण्याचा प्रयत्न करणे अशी कामे नेहमीच अग्रस्थानी राहतील.असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला...
हे नाते, हा जिव्हाळा, ही आपुलकी कधीच तुटू नये, अशीच भोळीभाबडी इच्छा सर्वांच्या मंनात कायम दाटून राहील, हे निश्चित...अशा भेटीने सगळीच मने तरुण झाली...नाती, मैत्री आणि प्रेम परिपूर्ण तिथेच होतात, जिथे त्यांना आदर आणि आपुलकी मिळते...
या प्रसंगी सर्वांनीच आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला व आपले मनोगत व्यक्त केले...
