मुरुड : मयुर पालवणकर
रायगडः फनसाडमधील रानगवे पोहोचले मुरुड शहरात
मुरुड तालुक्यातील फणसाड अभयारण्यात रानगव्यांची संख्या वाढली आहे. सुमारे ५४ चौरस किलोमीटर क्षेत्रात फणसाड अभयारण्य क्षेत्र व्याप्त आहे. फणसाडमध्ये १६ पेक्षा जास्त रानगवे असून गवत खाण्याच्या नादात ते मुरुड शहराच्या हद्दीपर्यंत पोहोचले आहेत. रानगव्यांना मोठ्या प्रमाणात खाद्य लागते...
जंगलातील गवत, झाडाचा कोवळा पाला हे त्यांचे आवडते खाद्य आहे. पावसाळा संपल्यानंतर दोन महिने जंगलात गवताचे प्रमाण असते, परंतु जानेवारीनंतर गवत संपते. त्यामुळे गवत शोधण्याच्या नादात सदरील रानगवे रस्त्याकडील जंगल भागात दिसू लागले आहेत...
