महाराष्ट्र वेदभुमी

देखो ! "नगर पंचायत खुद्द बिमारी फैला रही है"?

माणगावात कचऱ्याची तीव्र समस्या

पंचायतमध्ये कचरा पेटी नेण्यासाठी नागरिक

खासगी ठिकाणी पैसे घेऊन कचरा उचल कामगारबाबत गंभीर आरोप: ऍड. पंकज खामगावकर.

बाजार पेठेतील न चुकता कचरा उचल केले जाते.

माणगाव  :- (नरेश पाटील) गेल्या महिनानपासुन ते नवीन वर्ष 2025 उजाडून तीन आठवडे झाले.. माणगाव शहरातील अनेक वॉर्ड मध्ये नित्यदीन घर कचरा नगर पंचायतमार्फत उचल करण्याचा विषय सध्या ऐरणीवर? याबाबत अधिक माहिती अशी की स्वछता ठेवण्याचे काम नगर पंचायतची महत्वाचे जबाबदारी आहे मात्र सदर मोहीमेकरीता न.प. ठेकेदाराना घर कचरा उचल करण्याकरीता नेमलेला आहे... मात्र गेल्या वर्षाची डिसेंबर महिन्यापासून अनेक वेळ कचरा उचल करण्यासाठी येत असलेल्या घन्टा गाडी अनियमित वेळेत येणे त्याचबरोबर काही दिवस आड येणे, तीच अवस्था आजही कायम नव्या वर्षाच्या काळातही दिसून येत आहे...या समस्याबाबत सिटी-को - ओर्डीनेटर अतुल जाधव यांनी याबाबत ठेकेदारकडे संपर्क साधून याबाबत कचरा  उचलण्याबाबत समस्या जाणून घेतो असे अशी उत्तर दिले...मात्र कचरा गाडीची कचरा उचल करण्याची अनियमितता काही दिवस आड समस्या स्तिथी जैसे थेच ..दुसरीकडे ठेकेदार कर्मचारी कडे बोट तर कधी वाहन नादुरुस्थ तर कधी वाहन कमी असल्याची कारण देत पुढे सर्व सुरळीत होतील असे संपर्क केल्यावर सांगितले तसेच या पुढे वेळेत आणी नित्य कचरा उचल होतील अशी सांगितले मात्र 'येरे माझा मागल्या'..तर माणगाव नगर पंचायतचे स्वच्छता विभागा या समस्याबाबत काना डोळा करीत असल्याचे सरळ सरळ दिसत आहे... वॉर्ड क्र.१६ खांदाड येथीलच्या काही अंतर भागात गेली तीन दिवस घन्टा गाडी फिरकळीच नाही...यांनी कचरा साठून राहिल्याने दुर्गंधी वाढली आहे....या बाबत संबधित विभाग तसेच ठेकेदार यांना "व्हाट्सअप" द्वारे माहिती आमचा प्रतिनिधीने कळविले... दरम्यान वॉर्ड क्र. 02 येतेही तीच परिस्थिती असल्याची माहिती समोर आली आहे...याचा अर्थ सरळ सरळ आहे की अनेक वॉर्ड मध्ये हीच परिस्थिती दिसून आलीय... दरम्यान कहर बाब म्हणजे रविवारी दी.19 रोजी निजामपूर रोड, कालवा जवळ साई नगर पूर्व भागात वॉर्ड क्र. 02 येतील भागात सामाजिक कार्यकर्ते ऍड. पंकज खामगावकर यांनी बोलताना निदर्शनास आणून दिले आहे की सदर दिनी एक दीड तास कचरा गाडी त्या भागात उभी होती मात्र चालक नव्हता आणी काही तासानी गाडी कचरा उचल न करता निघून गेली...तसेच आवाज देऊन सुद्धा तो थांबला नाही...  तसेच एक धक्का दायक माहिती दिले की असे निदर्शनास आली की जो पैसे देतो त्यांचा कचरा उचल घन्टा गाडी कामगार खासगी लोकांचे करीत आहे तर ही बाब गंभीर आहे... या बाबत स्वतः नगर पं. यांना लेखी नोटीसद्वारे देऊन अश्या कर्मचारी तसेच ठेकेदार यांचावर कारवाई करा तसेच अशीच परिस्थिती राहिले तर थेट न. पंचायत कार्यालयात नागरिक कचरा पेठी घेऊन तिथे जमा करणार असल्याची अंती सांगितले आहे...यादरम्यान सोमवारी दी. 20 रोजी सकाळी वॉर्ड क्र. 02 येते कचरा गाडी येऊन गेली पण येथील कचरा गोळा न करता निघून गेल्याची बाब समजली आहे...तसेच माणगाव बाजार पेठेत नित्यनेम न चुकता विशेष करुन मोर्बा रोड भागात सायंकाळी उशिरा तसेच रात्री आठ ते 09:00 दरम्यान कचरा उचल हे चोक काम बजावले जात आहे... मग वॉर्ड क्र 02मधील रहिवासी भागात कचरा उचल ची अनियमितता का ? असे प्रश्न आहे...  दरम्यान मागचा आठवड्यापासून माणगाव नगर पंचायत स्वछता मोहीमबाबत जनजागृती करीत आहे... की सुका तसेच ओला कचराची व्हिलगीकरण करुन देण्यात यावी अन्यथा कचरा स्वीकारले जाणार नाही अशी दवंडी द्वारे न. पं. देत आहे.. मात्र कुठेही स्वछताबाबत सुस्थिती दिसत नसल्याने सगळी कडे दुर्गंधी पसरलीय यामुळे "देखो देखो माणगांव नगर पंचायत खुद्द बीमारी फेलारही है..."म्हण्याची वेळ आलीय..

Post a Comment

Previous Post Next Post