प्रतिनिधी कोप्रोली (महेश म्हात्रे) : जीवनात खरा आनंद कोणता असेल तर तो आपल्या मित्राच्या चेहऱ्यावरील आनंद...! इतरांच्या सुख दुःखात सहभागी होऊन संकट समयी आपल्या मित्राला आधार देणे होय.. आज जर स्नेह कुणी म्हटलं फक्त नात्या गोत्यात स्नेह समजलं जातो परंतु रयत शिक्षण संस्थेच्या स्नेह छताखाली संस्कारित शिक्षण घेतलेले A. S. C महाविद्यालय फुंडे टी वाय बी एस्सी बॅच रसायन शास्त्र व प्राणी शास्त्र बॅच 2000-2001 चे तब्बल 24 वर्षानंतर स्नेहमिलन कोप्रोली येथील फार्म हाऊसवर नित्यनियमाने रविवारी झाले...
स्नेहमिलन म्हणजे योगायोग होय! या स्नेहमिळनात प्रत्येक मित्र मैत्रिणीने सहभाग घेत आपल्या जुन्या आठवणी जाग्या केल्या... तत्कालीन शिक्षक या विषयी स्नेहभाव अर्पण करत आपल्या गुरुवर्य यांनी चांगलं मार्गदर्शन केले.. यामुळे आपण सामाजिक स्तरावर चांगल्या आदर्श यासहित आपला जिवन प्रवास एक सफल उद्देशाने करत असतो.. सद्य काळात हयात नसलेल्या वंदनीय गुरुवर्य रसायन शास्त्र शिक्षक कैलासवासी रोकडे सर व तसेच बॅचचे विद्यार्थी दिनेश म्हात्रे व गैनीनाथ यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली... तसेच आजचा दिवस हा खूप महत्वचा म्हणून प्रत्येकाने आपल्या बॅच विषयी मनोगत व्यक्त केले..अनेक नवीन जुन्या आठवणीना उजाळा मिळाला तर प्रत्येक मित्र कोणत्या क्षेत्रात सद्या कार्यरत आहे हे ही समजले.. महाविद्यालयिन जीवनातील केलेल्या मौज मजा सादर करून विविध प्रकारचे मनोरंजक म्हणजे नृत्य, गीत गायन किंवा नृत्य कला आविष्कार असे विविध उपक्रम घेण्यात आले... एकत्र येऊन जी मजा अनुभवतो ती निराळी असते तसेच या स्नेहमिलन यात बॅचतर्फे एक विशेष लकी ड्रा आयोजित करण्यात आला.. यात विज्येत्याना सन ग्लास गॉगल भेट देऊन सन्मानित करण्यात आले...यात विजेते व्यंकटेश , व कल्पना ठाकूर हे ठरले... एक अभिनव् उपक्रम म्हणून बॅचचे सदस्य चेतन म्हात्रे व आरती मोहोकर यांच्या सौजन्याने बॅच चा लोगो असणारा एक किचैन हा प्रत्येक ग्रुप सदस्य यांना भेट देण्यात आला..कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी टी वाय बी एस्सी बॅच 2000-2001 च्या सर्वच ग्रुप सदस्य यांनी कमालीची मेहनत घेतली... प्रत्येक ग्रुप सदस्य यांच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद होता.. अमित मुंबईकर याने अप्रतिम बासरी वादन करीत सर्वांची मने जिंकली...तब्बल 24 वर्षांनी टी वाय बी एस्सी बॅच रसायनं शास्त्र व प्राणिशास्त्र चा स्नेहमिलन मेळावा पार पडला...
