असे शिबीर वारंवार घेण्याचे मानस आहे -डाॅ. उदय पाटील
विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन व महिलांसाठी आरोग्य शिबीर घेण्याचे प्रयत्न -किरण ताठरे
रोहा - प्रतिनिधी :- मेंदू व मणका रोग्य तज्ज्ञ, हृदय रोग तज्ज्ञ, मेंदू विकार तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत व रोटरी क्लब ऑफ रोहा ,रोहा नगर परिषद व सूरज हाॅस्पिटल नवी मुंबई सानपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने अनेक रोगांवर महा आरोग्य शिबीरचे आयोजन करण्यात आले होते..
रायगड जिल्ह्यात रोहा शहरात रोटरी क्लब ऑफ रोहा, रोहा नगर परिषद व सूरज हाॅस्पिटल सानपाडा नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हे महाआरोग्य शिबीर ,उपचार व मोफत औषध वाटपचे आयोजन करण्यात आले...
यावेळी मेंदू व मणका विकार तज्ज्ञ डॉक्टर आर,एन पाटील,हृदयविकार तज्ज्ञ डॉक्टर उदय पाटील, मेंदूविकार तज्ज्ञ डॉक्टर रमा पाटील, मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अंजली पाटील, या डॉक्टरांनी मेंदूचे आजारांवर, मटक्याचे आजारांवर , मानसिक विकार, हृदयविकार, ऑथोॅपेडिक आदीचे अनेक रोगांची तपासणीत करून मोफत उपचार केले व शिबीर आयोजकांनी मोफत औषध वाटप केले या शिबीर विषयी अधिक माहिती देताना हृदयविकार तज्ज्ञ डॉक्टर उदय पाटील म्हणाले महात्मा फुले योजने अंतर्गत हे शिबीर आयोजित केले आहे आमच्या सूरज हाॅस्पिटल सानपाडा नवी मुंबई येथे ही योजना सुरू झाली आहे याचा फायदा रुग्णांना घेता येईल आणि लवकर मी रोहाचे डॉक्टर अशोक जाधव यांच्या हाॅस्पिटल मध्ये आठवड्यात एक दिवस बसणार आहे त्याचा फायदा ही येथील हृदयविकार रुग्णांना घेता येणार आहे आणि पुढील काळात या प्रकाराचे शिबीर वारंवार घेण्याचे मानस आहे. या नंतर रोटरी क्लब ऑफ रोहा चे अध्यक्ष किरण ताठरे यानी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले हा शिबीर सर्वांन साठी आहे सर्वानी याचा लाभ घ्यावा ते पुढे म्हणाले पुढील काळात रोटरी क्लब ऑफ रोहा तर्फे महिलांच्या आरोग्य विषयी शिबीर आयोजित करायचे आहेत व विद्यार्थ्यांन साठी मार्गदर्शन शिबीर ही आयोजित करायचे आहेत तसेच या प्रकाराचे शिबीर ही वेळोवेळी आयोजित करायचे आहेत आत्ताच काही महिने आधी रोटरी क्लब ऑफ रोहा यानी महाड येथे विकलांग लोकांसाठी शिबीर आयोजित केला होता त्यात आम्ही कृत्रिम हात ,पाय गरजूंना बसुन दिले. तसेच आज या शिबिरा साठी उपस्थिती राहिलेल्या सर्व मान्यवरांचे सर्व डॉक्टर व त्यांच्या टीम व सहकार्य करणार्यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो आणि असच सहकार्य राहील याची अपेक्षा करतो. सदर शिबिराचा 200 लोकांनी लाभ घेतला या कार्यक्रमात विजयराव मोरे, विनोद भाऊ पाशिलकर, संतोष पोटफोडे, महेश कोलटकर महेंद्र गुजर ,जिल्हा आयुष अधिकारी डॉक्टर विश्वनाथ देशमुख, जेष्ठ पत्रकार अरुण करंबे, अमित मोहिते, जयवंत मुंडे, रोहीदास पाशिलकर, अनंता देशमुख आदीनी उपस्थितीत दर्शवली होती. हा शिबीर यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष किरण ताठरे सचिव प्रदीप चव्हाण, खजिनदार वरुण दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सभासद व रोटरी महिलांनी परिश्रम घेतले यावेळी बहुसंख्य रोहेकर नागरिक उपस्थित होते.
