महाराष्ट्र वेदभुमी

कोलाड विभाग नाभिक समाजाकडून हुतात्मा वीरभाई कोतवाल यांची पुण्यतिथी साजरी

कोलाड (श्याम लोखंडे) : रोहा तालुक्यातील रायगड जिल्हा नाभिक तरुण संघ समाज मंदिर सामाजिक संस्था कै. पा.रा.सकपाळ सभागृह पाले बु.कोलाड येथे २ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ६. ०० वाजता दिपप्रजोलन करून हुतात्मा वीर भाई कोतवाल यांची ८२ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली...  वीर भाई कोतवाल अमर रहे, अमर रहे अशा घोषणांनी  सारे समाज मंदिर दुमदूमले होते...सदरठिकाणी मशाल पेटवून सारे नाभिक समाज एकटवले होते...    

              यावेळी  यशवंत खराडे, सदानंद साळूंके, काशिनाथ रावकर, विनायक दिवेकर, विजय रावकर, अशोक कदम, प्रभाकर मोहिते, नथुराम दिवेकर, वसंत खराडे, चंद्रकांत खराडे, दत्ता खराडे, शंकर दिवेकर, राजेंद्र खराडे, विजय पवार, नितीन पवार, शांताराम खराडे, अनिल खराडे, वंदना खराडे, अनिता साळूंके, अश्विनी कदम तसेच असंख्य नाभिक समाज बांधव उपस्थित होते... 

   नाभिक समाजात जन्मलेल्या भाई कोतवाल यांनी गरिबीवर मात करीत एल एल बी चे शिक्षण पूर्ण करून काही काल ब्रिटिश सरकारची नोकरी केली परंतु देश स्वतंत्र व्हावे यासाठी त्यांनी नोकरी सोडून यापुढे जगेन तर स्वतंत्रा साठी नाहीतर स्वर्गात अशी गर्जना करीत क्रांतिवीर गट स्थापन केला व ब्रिटिश सरकारला सलो कि पळो करून सोडले शेवटी सिद्धगडच्या जंगलात भाई कोतवाल वास्तव्याला असल्याचे समजले या गडाला ब्रिटिशांनी वेढाघालून २ जानेवारी १९४३ रोजी त्यांच्यावर गोळीबार केला यामध्ये ते धारार्थी पडले व देशासाठी शहीद झाले...

Post a Comment

Previous Post Next Post