महाराष्ट्र वेदभुमी

"वाचन संकल्प महाराष्ट्राचा"


या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत सामूहिक वाचन व वाचनाचे महत्व कार्यक्रमाचे आयोजन-जाहिद फकजी...

शहानवाज मुकादम/रोहा 

 मुरुड: नववर्षाच्या सुरुवातीलाच वाचनसंस्कृतीला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या माध्यमातून  वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा व्यापक उपक्रम दि: ०१ जानेवारी २०२५ ते १५ जानेवारी या कालावधीत राबविण्यात येत आहे...

 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी तसेच भावी उत्कृष्ट लेखक निर्माण करता यावे यासाठी अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स मुरुड जंजिरा या महाविद्यालयात कोंकण विभागाचे सहसंचालक डॉ. विजय नारखेडे, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. साजिद शेख व ग्रंथालय समिती यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे...

 दि:०१ जानेवारी रोजी विद्यार्थ्यांसाठी सामुहिक वाचन तसेच वाचनाचे महत्व या कार्य्रमाचे आयोजन करण्यात आले होते... या उपक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते... हा स्तुत्य उपक्रम विद्यार्थ्यांना वाचनातून नवी दिशा देणारा ठरणार असल्याचे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. साजिद शेख यांनी केले...

 या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी ग्रंथालय समिती प्रमुख प्रा. अलताफ फकीर, डॉ. फिरोज शेख , प्रा. जावेद खान व ग्रंथपाल प्रा. अंजुम दाखवे यांनी विशेष प्रयत्न केले...

Post a Comment

Previous Post Next Post