सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :- रामटेक तालुक्यातील नगरधन येथील ग्रामपंचायत कार्यालयात दि.०३ जानेवारी रोजी ; स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या व थोर समाजसेविका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले...
यावेळी सरपंच सौ. मायाताई अरुण दमाहे, सदस्या सौ. मीनाक्षीताई वाघमारे, रोशनीताई वासनिक, सौ. तरारेताई, सी.आर.पी. सौ. सीमा सुरेंद्र बिरनवार, आशा वर्कर सौ. करुणाताई पौनिकर, सौ. वैशालीताई बावनकुळे, प्रीती सरोदे उपस्थित होते...
सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एका गावात झाला... त्यांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. सावित्रीबाई फुले या समाजसेविका, स्त्री मुक्ती चळवळीत सहभागी आणि देशाच्या पहिल्या शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात...
त्यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर सौ सीमा सुरेंद्र बिरनावर , हे बोलत होते की सावित्रीबाई फुले, आणि महात्मा ज्योतिराव फुले, यांनी सन.१८४८ मध्ये पुण्यातील भिडे, वाड्यात मुलींसाठी शाळा सुरू करून देशात स्त्री शिक्षणाचा पाया रचला सन १८४८ ते १८५२. या कालावधीत सावित्रीबाईंनी पुणे आणि परिसरात १८, शाळा स्थापन केल्या असे सांगीतले... सावित्रीबाई फुले यांचा जन्म दलित कुटुंबात झाला... पूर्वीच्या काळी दलितांना शिक्षणापासून वंचित ठेवले जात होते, पण सावित्रीबाई फुले यांनी या सर्व वाईट गोष्टींविरुद्ध लढा दिला आणि आपले शिक्षण चालू ठेवले... त्यांना त्यांच्या समाजात अस्पृश्यतेचा सामना करावा लागला पण त्यांनी हार मानली नाही आणि शिक्षण चालू ठेवले...
त्यांच्या या कार्याबद्दल ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने त्यांचा गौरव केला... सावित्रीबाई फुले यांनी त्यांचे पती ज्योतिबा फुले यांच्यासमवेत अनेक चळवळींमध्ये भाग घेतला, त्यातील एक सती प्रथा होती... स्त्रिया विधवा झाल्यावर मुंडण करण्याच्या प्रथेच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला...
