लाभार्थ्यांनी मोबाईल नंबर आधारला लिंक करा
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :- तालुक्यातील संजय गांधी व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांनी त्यांचा मोबाईल नंबर आधारला लिंक करण्याचे आवाहन तहसीलदार रामटेक रमेश कोळपे यांनी केले आहे... या संदर्भातील सूचना नायब तहसीलदार मुकूंद भुरे यांना देण्यात आली आहे...
संजय गांधी योजना विभागातील श्रावणबाळ सेवा निवृत्तीवेतन योजना व संजय गांधी निराधार वेतन योजना अंतर्गत लाभ घेणा-या लाभार्थ्याचे अनुदान जानेवारी २०२५ पासून डीबीटीद्वारे वितरीत करण्यात येणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी आधार कार्ड व बँक खाते हे मोबाईल नंबरशी लिंक करण्याबाबतची कार्यवाही स्थानीक आधार सेवा केंद्र येथून पूर्ण केली जाणार आहे. तसेच शिल्लक लाभार्थ्यांनी आधार कार्ड व बँक पासबूकची झेरॉक्स प्रत मोबाईल क्रमांकासह तलाठयांकडे ३१ जानेवारी पूर्वी जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही प्रक्रिया पूर्ण न करण्या-या लाभार्थ्याचे अनुदान जमा होणार नसल्याचे नायब तहसीलदार मुकूंद भुरे यांनी सांगीतले आहे...
