२१० रक्तदात्यांनी केले रक्तदान
सचिन चौरसिया प्रतिनिधी
नगरधन :- जगद्गुरु रामानंदाचार्य श्री. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज, जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीज, महाराष्ट्र तर्फे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांनच्या माध्यमातून रामटेक तालुक्यातील ग्राम पंचायत कार्यालय नगरधन येथे (दि.१८) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून एकूण २१० रक्तदात्यांनी रक्तदान केले...
‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान‘ असे समजले जाते. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. महाराष्ट्रात सिकलसेल अनेमिया, हिमोफिलीया, थॅलेसेमिआ, ब्लड कॅन्सर, किडनी फेल्युअर पेशंट जास्त आढळतात. अशा रुग्णांना वारंवार रक्ताची नितांत आवश्यकता असते. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्यांना रक्तबाटल्या देण्याचे संप्रदायामार्फत निश्चित केले आहे...
रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी जिल्हा-परिषद सदस्य श्री. नरेशजी धोपटे, सौ. मायाताई अरुण दमाहे (सरपंच नगरधन) व श्री. श्रीराम धोपटे (उपसरपंच नगरधन), श्री. प्रशांत कामडी (माजी सरपंच नगरधन) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. रक्तदान ही आजच्या काळाची गरज आहे. अनेकदा वेळेवर रक्त मिळत नसल्याने मृत्यू होण्याच्या घटना कानावर येतात. सामान्य जनतेस हा मदतीचा हात मिळावा, या अनुषंगाने या महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने श्री. विलास कुंभलकर (सदस्य ग्रा.पं. नगरधन), महादेव कामडी, शशिकांत गायधने, ईश्वर धोपटे, प्रशांत लाटकर, अंगद कामडी, विनोद कामडी उपस्थित होते...
