सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक:- देवलापार आदिवासी भागातील जिल्हा परीषदेच्या शाळेला वसतीगृहाची गरज आहे. दिवसेंदिवस कमी होत असलेली पटसंख्या लक्षात घेता येथे शासकीय वसचीगृहाची गरज असुन याबाबत सर्व प्रकारची माहिती जिल्हा परीषदेने दोळा केली असून त्यावर सकारात्मक विचार झाला असून लवकरच येथे वसतीगृह सुरु होणार असल्याची माहिती जिल्हा परीषदेच्या माजी सदस्या शांता कुमरे यांनी दिली. त्या जिल्हा परीषद हायस्कूल वडांबा येथे वार्षीक स्नेहसंमेलनात उद्घाटक म्हणून बोलत होत्या...
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा रेखा कुमरे होत्या... प्रमुख पाहूने उदय विद्यालयाचे मुख्याद्यापक युवराज शंकरपूरे, सरपंच मुकेश दुबे, लोकमत प्रतिनिधी कैलास निघोट, माजी उपसरपंच चमनलाल जैस्वाल, प्रतिभा पिल्लारे बोथिया पालोराचे मुख्याद्यापक पुरुषोत्तम धनविजय आदी उपस्थीत होते...
दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात आली प्रस्ताविक मुख्याध्यापिका शारदा कोडापे यांनी केले. यानिमित्याने सास्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते... त्याचप्रमाणे विज्यान प्रयोगशाळेचे उद्घाटन यावेळी करण्यात आले... कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माधुरी देशमुख यांनी तर आभार मेश्राम यांनी मानले... कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता प्रेम आडे यांचेसह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी सहकार्य केले...