माणगांव :- (नरेश पाटील) सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या माणगाव पोलीस ठाणे येते गुरुवारी दी. 23 जानेवारी रोजी 'रक्त दान' शिबीर उपक्रम सकाळी 11 वाजता हाती घेण्यात आला होता... सदर सामाजिक उपक्रम जिल्हा वाहतूक शाखा रायगडच्या संयुक्त सहकार्याने सकाळी माणगाव पोलीस ठाणे येथे पार पडले... तत्पूर्वी रक्त दान संकलित वैदकीय टीम यांचे पुष्प गुच्छ उपविभागिय पोलीस अधिकारी, माणगांव पोलीस प्रमुख तसेच वाहतूक शाखा अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत देऊन सुरुवात करण्यात आला... या रक्त दान उपक्रमात एकूण 35 पोलीस बांधव यांनी रक्त दान केले आहे... सध्या रायगड जिल्ह्यात "रस्ता सुरक्षा अभियान 2025" उपक्रम पार पडत आहे... या रस्ता सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून माणगांव पोलीस तसेच वाहतूक पोलीस यांनी संयुक्त सामाजिक उपक्रम हाती घेऊन एक आदर्श संदेश दिला आहे...