पुगाव - खांब (नंदकुमार कळमकर) मनोरंजनाची बदललेली साधने, तरुणाईच्या बदललेल्या आवडीनिवाडी, शहरातील हरवलेली मोकळी जागा व मैदाने भ्रमाणध्वनी मनोरे आदी विविध कारणामुळे पतंगाची दुकाने ग्राहकांनशिवाय ओस पडली आहेत.त्यामुळे बाजारात यंदा पतंग व मांज्याच्या विक्रीत सुमारे ५० ते ६० टक्के घट झाली आहे...
आधी संगणक आणि त्यानंतर भ्रमाणध्वनीच्या जाल्यात अडकलेली तरुणाई मैदानी खेळापेक्षा आभासी खेळामध्ये जास्त रमायला लागली आहेत...यामुळे जुन्या काळातील अनेक खेळ काळाच्या ओघात लोप पावत असून आता त्यामध्ये पतंगाचा ही समावेश झाला आहे... त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून पतंग आणि मांज्याच्या व्यावसायाला उतरती कला लागली आहे...
पतंग व्यावसाय जानेवारी पासून तेजीत असायचा या महिन्यात पतंग खरेदीसाठी गर्दी असायची यामुळे दुकानात दहा कारागीर पतंगाची विक्री करण्यासाठी कमी पडायचे यामुळे दहा माणसांचे कुटुंब आरामात जिवन जगत होते. आता पतंगाच्या दुकानात अजिबात गर्दी दिसत नाही काही ठराविक पतंग प्रेमी सोडले तर तरुणाईने पतंग उडविण्याकडे पाठ फिरवली असल्याने या व्यावसायाला उतरती कला लागली असल्याचे दिसून येत आहे...
प्रतिक्रिया
पूर्वी संक्रात सणासाठी पतंग उडवणे यांच्या स्पर्धा असायच्या परंतु कालांतराने लोकांच्या आवडीनिवडी बदलल्या क्रिकेट, कबड्डी, बरोबर आधुनिक काळातील तरुणाई मोबाईल मध्ये गुंतली याचा परिणाम हळूहळू पतंग उडविण्याकडे दुर्लक्ष होतांना दिसत आहे... हे असेच सुरु राहिले तर पतंग खेळ इतिहास जमा होईल - दिनकर सानप. सामाजिक कार्यकर्ते कोलाड
