सक्षमच्या कार्यक्रमात राज्याचे राज्यमंत्री उपस्थीती!
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक:- सक्षम दिव्यांग केंद्र व रियान हॉस्पिटल, रामटेक यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१२ जानेवारीला स्नेह सदन या विशेष विद्यार्थ्यांच्या शाळेत, दिव्यांग मुलामुलींसाठी निःशुल्क दंत व शारीरिक तपासणी शिबिराचे स्नेह सदन विशेष मुलांची शाळा शितलवाडी येथे आयोजन करण्यात आले होते. दोनशेहून अधिक दिव्यांगांनी शिबीरातील सेवांचा लाभ घेतला. शिबीराचे उद्घाटन महाराष्ट्राचे वित्त आणि नियोजन राज्यमंत्री आणि रामटेकचे आमदार मा. ना. ॲड.आशिषजी जयस्वाल महोदयांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी जमलेले दिव्यांगाचे पालक भाषणात बोलतांना मंत्री महोदयांनी सांगितले की, मागील अडीच वर्षांमध्ये दिव्यांगाच्या दृष्टीने राज्य सरकारने खूप चांगले पाऊल उचलले आहे आणि अजून खूप काही करणे बाकी आहे. महाराष्ट्रात महायुती सरकार दिव्यांगाच्या दृष्टीने समोर सर्वात उत्तम काम करणार आहे. दिव्यांग क्षेत्रात दिव्यांगाकरिता जे जे आवश्यक आहे त्यासर्व गोष्टी पूर्ण होतील, असे मी राज्य सरकारचा एक मंत्री म्हणून सांगतो असे त्यांनी यावेळी ठासून सांगितले...
जे-जे तुम्ही मला सांगाल त्या सर्व गोष्टी मी पूर्ण करेन अशी मी आपल्याला ग्वाही देतो, असे वचन आशिष जीं नी यावेळी दिले...
याच कार्यक्रमात मंत्री महोदयांनी रामटेक येथील सक्षमच्या सेवा केंद्राला १० केडब्लु सोलर सिस्टम मंजूर करून देण्याचं मान्य केले. या सोलर सिस्टीम मुळे,केंद्रातील थेरपी कक्षाच्या,अधिक प्रमाणातील विजेचा वापरातून होणारा खर्च कमी होणार आहे. तसेच या केंद्रात येणाऱ्या दिव्यांगाना पिण्याच्या स्वच्छ पाण्याकरिता ५ लक्ष रुपये चे वॉटर फिल्टर सिस्टम लावून देण्याचे मान्य केले...
रियान हॉस्पिटलचे संचालक डॉ.प्रदीप बोरकर, सक्षम विदर्भ प्रांत अध्यक्ष विजयसिंह मोहता, प्रांत उपाध्यक्ष रामदेव जी अग्रवाल, सक्षमचे नागपूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष तथा स्नेह सदन विद्यालयाचे मुख्याध्यापक पंकज पांडे, सक्षमच्या नागपूर जिल्हा महिला प्रमुख डॉ.अंशुजा किंमतकर, विदर्भ प्रांत संघटन सचिव आशुतोष देशपांडे; तसेच,सचिव, आकाशझेप फाऊंडेशनचे साक्षोधन कडबे,रा.स्व.संघाचे नगर संघचालक ॲड.किशोर नवरे, सक्षम रामटेकच्या मार्गदर्शिका आणि दिव्यांग सेवा केंद्राच्या प्रमुख प्रा.ललिता चंद्रात्रे, श्री संत गाडगे महाराज मूक बधिर निवासी विद्यालय शितलवाडी, शिक्षण विभाग, पंचायत समिती, रामटेक व स्नेहसदन येथील शिक्षक कर्मचारी व दिव्यांग मुले उपस्थित होते...
