महाराष्ट्र वेदभुमी

रामटेक पर्यटन व सांस्कृतीक महोत्सव २२ पासुन

नेहरू मैदानावर तिन दिवसीय महोत्सवाचे आयोजन

सेलीब्रिटी राहणार आकर्षणाचे केंद्र रामटेक

सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक :-पर्यटन व सांकृतिक महोत्सवाचे आयोजन पर्यटन संचालनालय , सांस्कृतिक कार्य विभाग आणि नागपुर जिल्हा प्रशाषण यांचे संयुक्त विद्यमाने येथील नेहरु मैदानावर (दि.२२) जानेवारी पासुन तीन दिवसीय सांकृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असुन, विविध स्पर्धा व सेलिब्रिटींचे आकर्षण राहणार आहे... अशी माहिती एसडीओ प्रियेश महाजन यांनी कार्यालयात पत्रपरिषदेत दिली...

   उपविभागीय कार्यालयात पत्रपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रियेश महाजन, तहसिलदार रमेश कोळपे, देवलापारच्या अप्पर तहसिलदार पुनम कदम ह्या प्रामुख्याने उपस्थित होत्या... दरम्यान एसडीओ प्रियेश महाजन यांनी माहिती देतांना सांगातले की रामटेक पर्यटन व सांस्कृतीक महोत्सवात दि.२२ जानेवारीला सुप्रसिद्ध गायिका शहनाज अख्तर यांचा गायनाचा कार्यक्रम तर बिंदू दारासिंग, पुनीत इस्सार, सिद्धांत इस्सार यांचे महानाट्य होणार आहे. तर २३ जानेवारीला सुप्रसिद्ध गायक उदीत नारायण यांचा गीत गायनाचा कार्यक्रम होईल. यानंतर २४ जानेवारीला सुप्रसिद्ध गायक सुखविंदर सिंग यांचा गायनाचा कार्यक्रम होईल...

संपूर्ण महोत्सवादरम्यान विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. यात रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, सायकल स्पर्धा, पॅरामोटर, माती कला स्पर्धा, स्केटींग स्पर्धा, फुड फेस्टीवल, हॉट एअर बलून, नौका बोटींग स्पर्धा चे आयोजन करण्यात येणार आहे... तसेच महोत्सवादरम्यान नेहरू मैदानाच्या सभोवताल महिला बचत गटांचे भव्य स्टॉल राहाणार आहे. तसेच या महोत्सवावेळी मागच्या महोत्सवासारखी पासेस ची सुविधा राहाणार नसल्याचे एसडीओ प्रियेश महाजन यांनी स्पष्टपणे सांगितले आहे... रामटेक महोत्सवात नागरीकांनी आवर्जुन सहभाग घ्यावा तथा तो यशस्वीरित्या पार पाडण्यात सहकार्य करावे असे आवाहन एसडीओ प्रियेश महाजन यांनी केलेले आहे...

जड वाहनांची वाहतुक वळविण्यात येणार

हा महोत्सव जसा भव्य स्वरूपात होणार आहे तशीच नागरीकांची गर्दी सुद्धा मोठी होणार आहे... तेव्हा वाहनांच्या पार्कींगसाठी तिन ठिकाणी व्यवस्था करण्यात येणार आहे... त्यात नागपुर कडून येणाऱ्या वाहनांसाठी राखी तलाव जवळ व तुमसर कडून येणाऱ्या वाहनांसाठी जवळील एका लॉनमध्ये तथा ठाकुर नगर येथील मिना बाजार मैदान येथे पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जड वाहनांची वाहतुक वळविण्यात येणार असुन तुमसर कडून येणाऱ्या वाहनांसाठी घोटीटोक पासुन अरोलीमार्गे शितलवाडी टी - पॉईट असा तर नागपुर कडून तुमसर कडे जाणारी वाहने सुद्धा याच मार्गाने रहदारी करेल असे एसडीओ प्रियेश महाजन यांनी सांगितले...

Post a Comment

Previous Post Next Post