सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :-जनप्राभा इंटरनॅशनल स्कूल, भोजापूर रामटेक येथे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद महाराष्ट्र शासन अंतर्गत समग्र शिक्षा अभियान मार्फत सुधारित शिक्षणासाठी शाळांचे बळकटिकरण करण्यासाठी नागपूर जिल्ह्यातील तालुका स्तरावरील गटशिक्षणाधिकारी यांच्या समक्ष त्यांच्या एखत्यारितील केंद्र प्रमुख व सर्व मुख्याध्यापक यांचे हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले...
या प्रशिक्षणात येणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना सुरक्षा आणि सुरक्षितात या बाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले आहे... तसेंच आपल्या शाळेत सुरक्षेचे काय बदल करण्यात यावे याबत प्रशिक्षित केले त्याच प्रमाणे शाळेतील मुला व मुलींची सुरक्षा साठी कोण कोणते उपाययोजना करावे या बाबतही प्रशिक्षित करण्यात आले, सदर प्रशिक्षण तालुक्यातील केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक यांनी घेऊन त्यांनी त्यांच्या शाळेतील शिक्षक व विध्यार्थी यांना देणे आहे त्याच प्रमाणे आपली शाळा कश्या प्रकारे सुरक्षित ठेवणे आहे याबाबत सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले होते...
या प्रशिक्षणात मा. विजय भाकरे सर गट शिक्षणाधिकारी, रामटेक, श्रीमती मंजुषा नंदेश्वर मॅडम शिक्षण विस्तार अधिकारी, रामटेक, श्रीमती शालिनी रामटेके मॅडम विस्तार अधिकारी रामटेक, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती, या प्रशिक्षणाचे मार्गदर्शन नीलिमा आंभोरे यांनी केले तर सूत्र संचालन मंगला मोहरकर यांनी केले, तर यशवंत मेश्राम सर (BRC रामटेक ) यांच्या प्रयत्नांनी सदर प्रशिक्षण यशस्वी पार करण्यात आले... यांच्या सोबतच कंपनीचे नागपूर जिल्ह्यातील जिल्हा समन्वयक अभिमन्यू पवार, मनोज कुकडे, सतीश गद्रे, मंगला मोहरकर, नीलिमा आंभोरे , प्रियांका कोचे, अनिकेत भालावी, शैलेश मनघटे, श्रेया पुंजरवार यांनी मेहनत घेतली आहे...
