६ महिन्याच्या वेळ होऊनही सोलर पंप लागले नाही
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक: पारंपरिक पद्धतीने वीज निर्मितीचा खर्च मोठा आहे. शिवाय पर्यावरणाची न भरून निघणारी हानी होत आहे. त्यामुळे सौर ऊर्जेकडे पर्याय म्हणून पाहिले जाऊ लागले आहे... शासनाने सौर ऊर्जेचा वापर वाढवण्याचे धोरण अवलंबले, कृषी पंपांना विजेचा अधिक वापर होतो... ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना आणली... रामटेक येथील शेतकरी महादेव नारायण लोखंडे रा. रामटेक अपलीकन्ट नं.एमएस 0506135012 यांनी सोलर पंप करिता १ जुलाई ला ऑस्ट्रेलियन व्ही टेक सोलर कंपनीची निवड केली... त्यावेळी कंपनीतर्फे सांगण्यात आले की एक महिन्यात सोलर पैनल चे इंस्टालेशन करून सोलर पंप चालू होईल... परंतु ६ महिन्याचा कालावधि लोटून सुद्धा सोलर पैनल इंस्टालेशन व सोलर पंपचे काम पूर्ण झाले नाही... कंपनी ने फक्त लोखंडी ऐंगल आणून ठेवले. त्यामुळे शेतकऱ्यांचे धान पिक व गहु पिकाचे नुकसान झाले. सोलर पंपचे काम पूर्ण झाले नसल्यामुळे कंपनी बदलवून देण्याबाबद महावीतरण कंपनी ला मांगनी केली आहे... विशेष बाब ही आहे की अनेक शेतकऱ्यांने सोलर पंपचे काम पेंडिंग आहे... त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. या बाबत महावितरणचे उपकार्यकारी अभियंता भारत बालपांडे यांचे कड़े विचारना केली असता ते म्हणाले की नागपुर महावितरण सर्कलला तक्रार करा... महावितरण सर्कलचे उपकार्यकारी अभियंता चौरागड़े म्हणाले की शेतकरी यांचे तक्रारची दखल घेत सोलर पंपचे काम ७ दिवसात पूर्ण करण्याचे आदेश संबंधित सोलर कंपनीला दिले आहे...
