महाराष्ट्र वेदभुमी

खुप कष्ट ,प्रयत्न करून यश आत्मसात करा - सरोजकुमार मिठारी (सहायक संपादक)



किशोर जासूद (कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी)

कोल्हापूरः- (दिनांक २१ जानेवारी) येथील जिल्हा परिषद कोल्हापूर संचलित मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कोल्हापूर येथील वर्ग १२वी च्या शुभेच्छा समारंभ प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रशालेचे माजी विद्यार्थी 'वळण' पुस्तकाचे लेखक सहाय्यक संपादक मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ वाई चे सरोजकुमार मिठारी उपस्थित होते...

ते म्हणाले१२वी पर्यंतचे शिक्षण हे शिक्षक आपणास प्रेमाने हात फिरवित योग्य अयोग्य गोष्टीची जाणीव देत पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यावहारिक ज्ञानाचे धडे देतील; पण नंतर उचशिक्षणात तुम्हाला स्वतःचे ज्ञान स्वतः प्राप्त करावे लागणार...अशावेळी आपल्यासमोर प्रलोभनाची अनेक साधने येतील, संगत कशी असेल सांगता येत नाही, १२वी नंतरचे वळण फार महत्वाचे आहे, ते वळण फक्त सद्गुण व सत्कार्याचे असावे... आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रचंड मेहनत, कष्ट करून यश मिळविण्याचा प्रयत्न करा... सोशल मीडियाचा अतिरेक टाळा... चांगली पुस्तके वाचा व चांगल्या माणसांच्या सान्निध्यात रहा. आयुष्य खुप सुंदर आहे..

या कायक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. गजानन खाडे सर म्हणाले की, येणाऱ्या परीक्षेला आनंदाने, अभ्यासाने सामोरे जा. तुमची स्वतःची ओळख हीच आमच्या महाविद्यालयाची ओळख होइल...कॉपीमुक्त अभियानाला प्रतिसाद द्या. सरोजसारखे अनेक विद्यार्थी तयार व्हावेत हीच प्रार्थना. तुमच्या आदर्शानुसार वाटचाल करा...

याप्रसंगी दैनिक सकाळचे वरिष्ठ वार्ताहर संतोषकुमार मिठारी व पीएचडी करत असलेले निलेश सूर्यवंशी यांचा सत्कार प्राचार्य डॉ.गजानन खाडे,उपप्राचार्या प्रा. वनिता खडके, पर्यवेक्षिका शीतल पत्रावळे, प्रा बाबासो माळवे यांनी केला...

पायल कांबळे, ऐश्वर्यालक्ष्मी राऊत, पायल दिगंबरे, सानिका आवळे, अल्फिया भिसुरे, गायत्री आंबी, सानिका गायकवाड, समर्थ संकपाळ, प्राची मोहिते, वैष्णवी तपासे, रिया पाटील या विद्यार्थ्यांनी व प्रा. रेश्मा पाटील यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक केले...

 पाहुण्यांचे स्वागत व परिचय प्रा. बाबासो माळवे, प्रास्ताविक प्रा. बाबुराव यादव सुत्रसंचालन प्रा. सुषमा पाटील आभार प्रा. अयोध्या धुमाळ यांनी मानले...

कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. हर्षवर्धन काटकर, प्रा.विकास पाटील, प्रा.भाऊसाहेब धराडे, प्रा. राहूल देशमुख ,प्रा.सपना माने, प्रा. दिपा लोहार, डॉ. संतोष माने, प्रा. प्रणाली जांभळे, प्रा. सचिन वडाम, प्रा. श्रुतिका मांगलेकर, प्रा सुषमा शेरखाने सर्व शिक्षक, शिक्षकेतर वृंद, विद्यार्थी यांनी योगदान दिले...

Post a Comment

Previous Post Next Post