महाराष्ट्र वेदभुमी

वीज कर्मचारी नागपूर ग्रामीणची कार्यकारणी जाहीर


अध्यक्ष ओमप्रकाश मेश्राम व उपाध्यक्ष चंद्रकांत खैरे यांची निवड

सचिन चौरसिया प्रतिनिधी 

रामटेक : महाराष्ट्र वीज कामगार महासंघ, संलग्न भारतीय मजदुर संघटनेचे १० वे त्रैवार्षिक अधिवेशन, नुकतेच आळंदी , पुणे येथे संपन्न झाले. त्यात नागपूर ग्रामीण प्रविभाग (मंडळ) कार्यकारणी जानेवारी २०२५ - डीसेबर २०२७  पर्यन्त दोन वर्षा करिता जाहीर करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी ओमप्रकाश मेश्राम व उपाध्यक्षपदी चंद्रकांत खैरे यांची निवड करण्यात आली. त्याच प्रमाणे उपाध्यक्ष किरण कारिकर, सचिव प्रशांत धिरडे, सहसचिव राजेश राऊत, सहसचिव  प्रशांत खरबडे, संघटन मंत्री सचिन्द्र राजूरकर, कोषाध्यक्ष हितेश मोकाती, कार्यालय प्रसिद्धी प्रमुख अक्षय भालेराव, महिला प्रतिनिधी वर्षा खेवले यांची निवड करण्यात आली. कर्मचारी संघटनाने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या...

Post a Comment

Previous Post Next Post