सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक: रामटेक- इतवारी लोकल ही रामटेक परिसरातील रेल्वे प्रवासी करिता जीवनवाहिनी आहे. १० रुपये रामटेक ते नागपुर रेल्वे टिकिट असल्याणे प्रवासी लोकल पसंद करतात... मात्र गेल्या तीन वर्षापासुन रेल्वे महिंन्यातून १५ दिवस उशिरा धावत असल्याने प्रचंड मनस्ताप होत आहे... सकाळची व सायंकाळची रेल्वे दोन दोन तास उशीरा पोहचने व लेट येत असल्याचे प्रवाशी यानी सांगितले...
इतवारी ते रामटेक लोकल रामटेकला पोहोचण्याची वेळ सकाळी ७ वाजता व रामटेकहून सुटण्याची वेळ सकाळी ७.३० आहे... नागपूर येथे आगमनची वेळ ८.४५ आहे... परंतु उशिरा धावते... रामटेक ते इतवारी नागपूर अंतर फक्त ३८ किमी आहे... मात्र उशिराने पोहोचने व उशिराने त्यामुळे स्थानिक, विद्यार्थी, व्यापारी, नोकरदार व्यावसायिक, मजूर खुप त्रस्त आहेत... प्रवासी यानी त्यांच्या कार्यालयात कधी जायचे, अशी विचारणा केली आहे... बहुतांश मजूर रामटेकच्या ग्रामीण भागातून मजुरीसाठी नागपूरला जातात... उशीर झाल्यास त्यांना कामावरून परतावे लागते.... रेल्वे त्याच्यासोबत क्रूर चेष्टा करत असल्याचे त्यानी सांगितले... त्यांना न्याय कोण देणार,असा सवाल त्यांनी केला..
लोकल लेट होण्याचे कारण:
रामटेक व कन्हानच्या मध्ये डुमरी येथे कोल डेपो आहे... येथून दररोज ४ मालगाडी कोळसा जातो... येथे सिंगल लाईन असल्याने जोपर्यंत मालगाडी जात नाही तोपर्यंत लोकलला सिग्नल मिळल नाही...
लोकल वेळेवर जात नाही त्यामुळे प्रवासी वाटेल त्या साधनाने जातात... त्यामुळे रेल्वेचे आर्थिक नुकसान होते व प्रवासी यांना भारी त्रास सहन करावा लागतो... प्रवासी म्हणाले की कन्हान ते डुमरी पर्यंत लीसरी लाईन टाकल्यास रामटेक लोकल सुरळीत चालू शकते...
