चणेरा विभागातील सोन्याच्या स्पर्धा
प्रतिनिधी - सत्यप्रसाद आडाव चणेरा : रोहा तालुक्यातील सारसोली येथे मकर संक्राती निम्मिताने श्री सोमनाथ क्रिकेट क्लब सारसोली चषक २०२५ पर्व ३४ वे ओव्हरआर्म टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन ११ जाने. ते १३ जाने. या कालावधीत स्पर्धा पार पडल्या . स्पर्धेचे उद्घाटन शनिवार दि. ११ जाने. रोजी श्री सोमनाथ क्रिकेट क्लबचे अध्यक्ष दिनेश पवार , गिरीश जैन , महेश चालके , संकेत साळवी , प्रविण कडव , कल्पेश बेणारे यांच्याहस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले.
या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सागर सम्राट न्हावे विरुद्ध आर. बी. सी. चणेरा यांच्यात झाली. आर. बी. सी. चणेरा संघाच्या विजय घाणेकर च्या चौकारासहीत संघाने १३ धावा केल्या . तर सागर सम्राट न्हावे संघाच्या हुसेन डाके ने मारलेला षटकार आणि स्वराज्य देवळे ने मारलेल्या चौकारांने सागर सम्राट न्हावे संघाने विजय मिळविले.
सामन्यात सागर सम्राट न्हावे प्रथम क्रमांक १,२५,००० /- रु. व भव्य चषक , आर. बी. सी. चणेरा संघाने द्वितीय क्रमांक ६०,००० /- व भव्य चषक , नमन इलेव्हन सारसोली संघाने तृतीय क्रमांक ३०,००० /- व भव्य चषक , दत्तकृपा सुरई संघाने चतुर्थ क्रमांक ३०,००० /- व भव्य चषक तर नमन इलेव्हन सारसोली संघाचा रवी गुले याला सोन्याची चैन देऊन मालिकावीर व सागर सम्राट न्हावे संघाचा स्वराज देवळे याला सोन्याची आंगठी देऊन सामनावीर गौरविण्यात आले. प्रत्येक सामन्यात चौकार हॅट्रिक व षटकार हॅट्रिक साठी एक ग्राम सोन्याचे कडे देण्यात आले...
राजू साळुंखे, विघ्नेश माळी, शिवसेना तालुका प्रमुख मनोजकुमार शिंदे, उपतालुका प्रमुख उद्देश वाडकर, बाळकृष्ण पवार, काशिनाथ चाळके यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले... स्पर्धेत जयेश भोसले, प्रथमेश ठाकूर तर सुत्रसंचालन प्रदिप भोईर यांने उत्कृष्ट काम केले... स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री सोमनाथ क्रिकेट क्लबचे व सारसोली ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली...
