महाराष्ट्र वेदभुमी

तीनविरा येथील आगरी समाजातील कल्पना पाटील यांचे हृदयविकाराने निधन

 

सोगाव - अब्दुल सोगावकर : अलिबाग तालुक्यातील कुरकुंडी-कोलटेंभी ग्रामपंचायत हद्दीतील तीनविरा येथील आगरी समाजातील कल्पना किशोर पाटील (वय ४२) यांचे सोमवार दि. १३ जानेवारी २०२५ रोजी पहाटे साडेचार वाजता हृदयविकाराने पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात निधन झाले...

          शनिवार दि. ११ जानेवारी रोजी त्यांना श्वास घेण्यात अडचण होत असल्याने त्यांना प्रथम अलिबागच्या डॉ. रानवडे रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले... तेथे अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरु असतानाच सोमवार दि. १३ जानेवारी रोजी पहाटे साडेचार वाजता त्यांची प्राणज्योत मालवली... त्यानंतर त्यांच्यावर अलिबाग तालुक्यातील तीनविरा येथील स्मशानभूमीत मोठ्या शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले... त्यावेळी विविध थरांतील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नेहमी हसमुख असणाऱ्या कल्पना पाटील या पाटील परिवारातील लाडक्य़ा सुनबाई होत्या... परिवारासह गावातील प्रत्येक कार्यक्रमात त्या नेहमीच अग्रेसर असायच्या... त्यांचा दशक्रिया विधी २२ जानेवारी रोजी दिवलांग येथे होणार असून, बारावे २४ जानेवारी रोजी तीनविरा येथील राहत्या घरी होणार असल्याचे पाटील कुटुंबियांतर्फे सांगण्यात आले...

Post a Comment

Previous Post Next Post